स्मिता विवेक घळसासी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 21:48 IST2021-09-22T21:47:49+5:302021-09-22T21:48:32+5:30
Nagpur News सुप्रसिद्ध विचारवंत, वक्ते आणि प्रवचनकार विवेक घळसासी यांच्या पत्नी स्मिता घळसासी यांचे नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले.

स्मिता विवेक घळसासी यांचे निधन
नागपूर: सुप्रसिद्ध विचारवंत, वक्ते आणि प्रवचनकार विवेक घळसासी यांच्या पत्नी स्मिता घळसासी यांचे नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा प्रणव, सून पूनम, नातू, नात आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सहकार नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुळचे पंढरपूरचे रहिवासी असलेले घळसासी दाम्पत्य २०१५ सालापासून नागपूरला स्थायिक झाले आहे. सध्या उज्ज्वलनगरात रहात असलेल्या स्मिता घळसासी यांनी सहजीवनाच्या सुरुवातीला सुमारे सहा वर्षे वनवासी क्षेत्रात दाम्पत्यव्रती म्हणून विवेकजींसह पूर्णवेळ काम केले. त्यांना अध्यात्मात रुची होती. बृहन्महाराष्ट्रात पसरलेल्या विवेक घळसासी यांच्या सांस्कृतिक परिवाराशी त्यांचे घनिष्ठ नाते होते.