शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

-तरच होईल स्मार्ट सिटी

By admin | Updated: October 17, 2015 03:07 IST

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहराची निवड केली. मिहान, मेट्रो रेल्वे अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे ...

पायाभूत सुविधांचा विकास हवा : स्थानिक प्रश्नांना हवे प्राधान्यनागपूर : केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहराची निवड केली. मिहान, मेट्रो रेल्वे अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे आधीच महत्त्व वाढलेल्या या उपराजधानीचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात झाल्यामुळे या शहराचे महत्त्व अधिकच वाढले आहे. नागपूरला स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्व पातळीवर धडपड सुरू आहे. सामान्य नागरिकांपासून ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सर्वांच्याच सूचना यासाठी मागितल्या जात आहे. यासाठी सर्व स्तरातून होत असलेले प्रयत्नही प्रशंसनीय आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जावा, या शहराला सुविधायुक्त शहराचा मान मिळावा, नागपूरकरांचे जीवनमान उंचवावे यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाला ‘लोकमत’चेही तेवढेच भक्कम पाठबळ आहे. मात्र, शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असताना सध्या असलेल्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. सध्या दुर्लक्षित असलेल्या या प्रश्नांची वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात हेच प्रश्न अडथळे निर्माण करणारे ठरतील. अशाच काही प्रश्नांचा उहापोह आम्ही ‘तरच होईल स्मार्ट सिटी’ या वृत्त मालिकेंतर्गत करीत आहोत. नागपूरला स्मार्ट सिटी करीत असताना नागपुरात नेमके कोणत्या बाबींवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, हे शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून देणे व नागपूरच्या सर्वांगीण विकासात हातभार लावणे हाच यामागील उद्देश आहे.(प्रतिनिधी)स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूरच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, एवढ्या रकमेत नागपूरचा विकास करणे शक्य नाही. यासाठी किमान साडेचार हजार कोटी रुपयांची गरज भासणार आहे. मात्र, एवढा पैसा खर्च करूनही स्थानिक असुविधेकडे दुर्लक्ष झाले तर नागपूर ‘स्मार्ट’ होणार नाही. स्मार्ट सिटी होत असताना नागपूरचा झपाट्याने विस्तार होणार आहे. बांधकामे वाढतील. इतर शहरांतून रोजगारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढेल. एकूणच या शहरातील नागरी सुविधांवरील भार वाढणार आहे. हा भार पेलविण्यासाठी नागपूर सक्षम आहे का ? नसेल तर आधी ते करावे लागेल. तरच नागपूर स्मार्ट सिटी होईल. स्मार्ट सिटी करताना या शहरातील रस्ते, पथदिवे, नाल्या, गटारी आदींमध्ये मोठी सुधारणा करावी लागेल. शहराची स्वच्छता, डम्पिंगची सोय, कचऱ्यावर प्रक्रिया करावी लागेल. बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट, जास्तीत जास्त सांडपाण्यावर प्रक्रिया करावी लागेल. पावसाळी नाली, नदीनाल्यांची स्वच्छता करून गडर लाईनची सोय करावी लागेल. पथदिव्यांची व्यवस्था करून ऊर्जा बचत प्रकल्प राबवावे लागतील. अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवून फूटपाथ मोकळे करावे लागतील. नागरिकांना चालण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज तयार करावे लागतील. आग विझविणारी यंत्रणा स्मार्ट हवी. अवैध व नियोजनात अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांवर कारवाई करावी लागेल.शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, वृक्षारोपण व संवर्धन, तलावांचे संवर्धन आदी बाबींवर लक्ष द्यावे लागेल. येथील विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर सुविधा हव्या. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महापालिकेसह सर्व शासकीय यंत्रणेमार्फत दिली जाणारी आरोग्य सेवा अधिक सक्षम करावी लागेल. शहरातील सर्वच भागात २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा करावा लागेल. उद्याने व बाजारपेठांचा विकास, मेट्रो रिजनचा नियोजनबद्ध विकास, सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची सोय, शॉपिंग झोन, फूड पार्क, कन्व्हेंशनल सेंटर आदी उभारावे लागतील. उपराजधानीत सुमारे दोन लाख युवक बेरोजगार आहेत. या बेरोजगांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करावी लागेल. या शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल. शासकीय यंत्रणेला लागलेली भ्रष्टाचाराची उधळी नष्ट करावी लागेल. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले व विकासात येणारे हे अडथळे दूर केले तरच नागपूर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल.