शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

स्मार्ट सिटी बाधितांना घर भाड्याने घेण्यासाठी मिळणार दरमहा ५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 20:30 IST

नागपूर शहरातील भरतवाडा, पुनापूर आणि भांडेवाडी क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. स्मार्ट सिटीच्या सुधारित पुनर्वसाहत आणि पुनर्वसन धोरणानुसार प्रकल्प बाधितांना भाड्याचे घर घेण्यासाठी दरमहा ५ हजार रुपये किमान भाडे मिळणार आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाची मंजुरी : चेअरमन प्रवीण परदेशी यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील भरतवाडा, पुनापूर आणि भांडेवाडी क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. स्मार्ट सिटीच्या सुधारित पुनर्वसाहत आणि पुनर्वसन धोरणानुसार प्रकल्प बाधितांना भाड्याचे घर घेण्यासाठी दरमहा ५ हजार रुपये किमान भाडे मिळणार आहे. तसेच वाणिज्य व औद्योगिक क्षेत्रातील बाधितांना दरमहा १० हजार भाडे तर प्रकल्प बाधितांचे घर ७०० चौ.फूटाहून अधिक असल्यास त्यांना प्रती चौ.फूट ७.५० रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय मंगळवारी महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.नागपूर स्मार्ट सिटीचे चेअरमन व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर संदीप जोशी, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर मनिषा कोठे,स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, पोलीस आयुक्त डॉ. भूषण उपाध्याय, आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, संचालक अनिरुध्द शेणवाई, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे, नगरसेविका मंगला गवरे आदी उपस्थित होते.प्रोजेक्ट टेंडर शुअरच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रकल्पग्रस्त सहकार्य करीत असल्याने प्रकल्पाला गती मिळाली आहे. सदर प्रकल्प पथदर्शी असल्यामुळे नागपूर शहरातील इतर अविकसित भागातही राबविण्यात यावा, तसेच रस्त्याचे निर्माण कार्य तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रवीण परदेशी यांनी दिले. स्मार्ट सिटीतर्फे आतापर्यंत ४३ प्रकल्प बाधितांना २.९२ कोटीचा मोबदला देण्यात आला. पारडी, भरतवाडा, पुनापूर आणि भांडेवाडी क्षेत्रात १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. या भागातील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४ जलकुंभाचे निर्माण व नदीवर पुलांचे बांधकाम हाती घेण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठ,े सत्तापक्ष नेते संदीप जाधव, बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच दीपक कोचर यांची संचालक मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. बैठकीत ३० विषयांना मंजुरी देण्यात आली.मोरभवन येथे चार्जिंग सेंटर उभारणारस्मार्ट सिटी फेलोतर्फे तयार करण्यात आलेल्या सौरऊर्जेवर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या मोरभवन येथे उभारणीला मंजुरी देण्यात आली. अपारंपरिक ऊर्जास्रोताच्या माध्यमाने इलेक्ट्रीक बसची बॅटरी चार्ज करण्यात येईल. महापालिकेच्या इलेक्ट्रीक बस आणि खाजगी कार वाहनांची बॅटरी चार्ज करण्यास मदत होईल. या प्रकल्पावर ४ कोटींचा खर्च येणार आहे.झिरो वेस्ट धोरणसंचालक मंडळाने झिरो वेस्ट धोरणाला मंजुरी दिली. स्मार्ट सिटी फेलोनी हा प्रकल्प तयार केला आहे. यात सुका कचरा रिसायकल करण्यात येईल. महिला बचत गटाच्या माध्यमाने यातून महिलांना रोजगार उपलब्ध होईल. याचा प्रारंभ धरमपेठ झोनमधून करण्यात येईल. या प्रकल्पासाठी संचालक मंडळाने ३४.१८ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूर