छोट्या छोट्या बदलांमुळे घर होऊ शकते सुंदर

By Admin | Updated: June 13, 2017 02:11 IST2017-06-13T02:11:35+5:302017-06-13T02:11:35+5:30

आपल्या घराला सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक महिला परिश्रम घेते. प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की आपले घर अधिकाधिक आकर्षक असायला हवे,...

Small changes can lead to homes because of the beautiful | छोट्या छोट्या बदलांमुळे घर होऊ शकते सुंदर

छोट्या छोट्या बदलांमुळे घर होऊ शकते सुंदर

घर सुंदर बनविण्याच्या गृहिणींनी जाणून घेतल्या टीप्स : रिन व लोकमत सखी मंचचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या घराला सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक महिला परिश्रम घेते. प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की आपले घर अधिकाधिक आकर्षक असायला हवे, परंतु घर नेहमी कसे सुंदर बनवून ठेवावे, याला धरून अनेकांच्या मनात संभ्रम असतो. गृहिणींच्या याच संभ्रमाला दूर करण्यासाठी रिन आणि लोकमत सखी मंचच्या वतीने ‘सुंदर माझे घर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर बिपासा पाटील यांनी सखींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, जेव्हा आपण घराला सजविण्यासाठी काही खरेदी करतो, तेव्हा जुन्या वस्तू घरातून काढायला हव्यात. अनेकदा जुन्या वस्तूंमध्ये लोकांच्या भावना जुळलेल्या असतात. परंतु आपल्या मनाला समजावून हे करायलाच हवे,नाहीतर घराची सुंदरता खराब करणाऱ्या वस्तूंचा घरातच ढीग लागतो. घराची पहिली खोली ही मोठीच असायला हवी. परंतु अनेक घरांची पहिली खोली छोटी असते. जर ही खोली छोटी वाटत असेल तर त्या खोलीमध्ये मोठा आरसा लावावा. यामुळे ही खोली मोठी दिसेल. याच पद्धतीने विविध रंगाचा वापर केल्याने वेगवेगळा प्रभाव पडतो.
प्रमुख पाहुणे म्हणून रिनच्यावतीने एचयूएलचे संचालक आदित्य गोखले, एचयूएलचे एक्झिकेटीव्ह जितेंद्र तिजारे, टेंडरनेस्ट किंडरगार्टनच्या संचालक आसावरी कुलकर्णी आणि प्रिजेनच्या संचालक विनी मेश्राम उपस्थित होत्या. ‘पाणी वाचवा’ ही शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आदित्य गोखले यांनी, रिनमुळे घराघरांतील पाणी कसे वाचविल्या जाऊ शकते याची माहिती दिली. दरम्यान पाणी वाचविण्याच्या आधारावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
रिन प्रस्तुत ‘वन मिनिट गेम शो’चे संचालन अमोल शेंडे यांनी केले. यात सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. संचालन नेहा जोशी यांनी केले.


किशोरी शहाणे व
बॉबीने साधला संवाद
कार्यक्रमाचे आकर्षण हिंदी-मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचा मुलगा अभिनेता बॉबी हा होता. या दोघांनी सखींसोबत संवाद साधला. सखींनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. या दरम्यान सखींच्या आग्रहावरून काही गाण्यांवर नृत्यही सादर केले.

स्पर्धेतील विजेते
पोस्टर आणि स्लोगन : प्रथम क्रमांक दीपिका भगत, द्वितीय क्रमांक अक्षरा भिडे, तृतीय क्रमांक स्नेहल लोंडे, चतुर्थ क्रमांक अनुष्का जगनाडे.
लेखन स्पर्धा : प्रथम क्रमांक अर्चना शिरदाते, द्वितीय क्रमांक सुमिता पाटील तर तृतीय क्रमांक वसुधा गुढे.

Web Title: Small changes can lead to homes because of the beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.