जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:15+5:302021-02-05T04:56:15+5:30
नागपूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय नागरी उपजीविका अभियान व राज्य शासनाच्या प्रमोद महाजन ...

जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण अभियानाला सुरुवात
नागपूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय नागरी उपजीविका अभियान व राज्य शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता तथा अभियान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण जिल्ह्यात सुरू झाले आहे. स्किल इंडिया या वेबपोर्टलवर भेट देऊन सुशिक्षित बेरोजगारांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये ७३३ उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र पुरस्कृत केंद्र व्यवस्थापन( सीएससीएम ) केंद्रामार्फत नागपूर व रामटेक येथे २४० उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. उर्वरित सर्व उमेदवारांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच इतर सर्व सुविधायुक्त असणाऱ्या खासगी केंद्रांमधून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
रोजगार स्वयंम रोजगाराभिमुख अल्पमुदतीच्या अभ्यासक्रम, मॉडेल्स उपलब्ध असून १५ ते ४५ वयोगटातील कोणत्याही गरजू उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ घेता येणे शक्य आहे. गरजू उमेदवारांनी स्किल इंडिया (स्किल इंडिया डॉट एनएसडीसीइंडिया डॉट ओआरजी ) या वेब पोर्टलवर भेट दिल्यास सर्व अद्ययावत माहिती उपलब्ध होऊ शकते. याठिकाणी उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य प्रशिक्षण व तद्नंतर कौशल्य प्रमाणपत्र व रोजगार स्वयंरोजगार संधी प्राप्त करता येणार आहे