स्कीट...नाट्याभिनय आणि पारितोषिकांची बरसात

By Admin | Updated: June 20, 2014 01:04 IST2014-06-20T01:04:23+5:302014-06-20T01:04:23+5:30

aराज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ५३ वी राज्य नाट्य स्पर्धा आणि अकरावी राज्य बालनाट्य स्पर्धा नागपूर, अकोला-अमरावती आणि चंद्रपूर केंद्रावर घेण्यात आली होती.

Skeet ... dramatics and rituals of rituals | स्कीट...नाट्याभिनय आणि पारितोषिकांची बरसात

स्कीट...नाट्याभिनय आणि पारितोषिकांची बरसात

राज्य नाट्य स्पर्धा : विभागीय स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
नागपूर : राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ५३ वी राज्य नाट्य स्पर्धा आणि अकरावी राज्य बालनाट्य स्पर्धा नागपूर, अकोला-अमरावती आणि चंद्रपूर केंद्रावर घेण्यात आली होती.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. या सोहळ्यात मुंबईच्या कलावंतांनी स्कीट, नाट्याभिनय आणि नृत्य सादर करून रंगत आणली.
सांस्कृतिक संचालनालयाचे सहसंचालक सानप प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या विद्यादेवी गोखले, दीनानाथ घारपुरे, पांडुरंग काळे, सविता पाटील, मनोहर सोमण, प्रसाद ठोसर, नीलांबरी खामकर, सुहास वीरकर, प्रकाश बाडकर, रितेश साळुंखे, स्मिता घारपुरे, सुनील शिंदे या परीक्षकांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमात प्रमोद भुसारी, रमेश अंभईकर, गिरीश पांडे, दीपक जोशी आदींच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेचे संचालन नागपुरातील समन्वयक रंगकर्मी वैदेही चवरे हिने केले होते. (प्रतिनिधी)
बालनाट्य स्पर्धा निर्मिती :
प्रथम : ‘तमर्सो मा ज्योतिर्गमय’- अमरावती
द्वितीय : थेंब थेंब श्वास - नागपूर
तृतीय : क्षितिजाच्या पलिकडे - अमरावती
उत्तेजनार्थ : अबूचा जयजयकार - बुलडाणा
अभिनय रौप्यपदक : सनथ रोटे आणि साक्षी शिरभय्ये
दिग्दर्शन :
प्रथम : आनंद वानखेडे - क्षितिजाच्या पलिकडे
द्वितीय : सुरेन्द्र वानखेडे - थेंब थेंब श्वास
उत्तेजनार्थ : गजानन सुरुशे - अबूचा जयजयकार
नेपथ्य : प्रथम : रामचंद्र ठाकरे - यंत्र युगाची ऐशीतैशी
द्वितीय : मयूर मेश्राम - क्षितिजाच्या पलिकडे
प्रकाशयोजना :
प्रथम : प्रकाश केदे - ‘तमसो मा ज्योतिर्गमय’- अमरावती
द्वितीय : किशोर बत्तासे - थेंब थेंब श्वास - नागपूर
रंगभूषा :
प्रथम : छाया पाठक - लाकडाची बाहुली - अमरावती
द्वितीय : चंद्रकांत कराळे - तपस्वी महामानव
अभिनय गुणवत्ता पारितोषिके : प्रियंका वंजारी, स्नेहा वाघमारे, श्रेया मेंढे, आंचल शिरसाठ, रिंकू रायबोले, पवन झांबरे, यश शिरोडकर, आल्हाद भोयर, शशिकांत शिंदे, कुमार मयूर यांनी देण्यात आलीत.
राज्य नाट्य स्पर्धा निर्मिती (नागपूर केंद्र)
प्रथम : ‘हे घ्या एक फूल’ - नाट्यभारती, इंदोर
द्वितीय : ‘ती रात्र’ - मित्र परिवार मंडळ, नागपूर
तृतीय : ‘हॅलो राधा मी रेहाना’ - अ‍ॅडव्हान्टेज, नागपूर
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : राजन देशमुख, रुपाली कोंडेवार-मोरे
दिग्दर्शन : प्रथम : श्रीराम जोग - हे घ्या एक फूल, इंदौर
द्वितीय : रोशन नंदवंशी ‘काही क्षण आयुष्याचे’, नागपूर
नेपथ्य :
प्रथम : सतीश फाळके - ‘सुखांशी भांडतो आम्ही’, इंदौर
द्वितीय : अवनी काशीकर - ‘ती रात्र’, नागपूर
प्रकाशयोजना :
प्रथम : मिथून मित्रा - ‘काही क्षण आयुष्याचे’, नागपूर
द्वितीय : अक्षय रामटेके - ‘टोली’, नागपूर
रंगभूषा :
प्रथम : नलिनी सलिम - ‘अरेबियन सोल्जर’, नागपूर
द्वितीय : सारंग मास्टे - ‘व्हिरेशियस’, नागपूर
अभिनयाची गुणवत्ता पारितोषिके : भाग्यश्री चिटणीस, श्वेता बोकारे, श्रुतिका जोग, सुनंदा साठे, श्रीराम जोग, मुकुंद वसुले, अतुल सोमकुंवर, गौरव अंबारे यांना पारितोषिके देण्यात आली.

Web Title: Skeet ... dramatics and rituals of rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.