शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नागपूर येथील बिल्डरला सहा महिन्यांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:09 IST

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने ग्राहकाचा विश्वासघात करणारा हर्षा कन्स्ट्रक्शन फर्मचा पॉवर आॅफ अ‍ॅटर्नीधारक धर्मेंद्र बंसीलाल जैनला सहा महिने सश्रम करावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देजेएमएफसी न्यायालय : ग्राहकाचा विश्वासघात केला१४ वर्षांनंतर निकाल

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने ग्राहकाचा विश्वासघात करणारा हर्षा कन्स्ट्रक्शन फर्मचा पॉवर आॅफ अ‍ॅटर्नीधारक धर्मेंद्र बंसीलाल जैनला सहा महिने सश्रम करावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.याप्रकरणात जैनची पत्नी निधी हीदेखील आरोपी होती. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता तिला निर्दोष सोडले आहे. तसेच, जैनला ठोठावलेल्या दंडातील आठ हजार रुपये तक्रारकर्ते ग्राहक संजय रामचंद्र धुमाळ यांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायाधीश डी.ए. तिवारी यांनी हा निर्णय दिला आहे.तक्रारीतील माहितीनुसार, धुमाळ यांनी आरोपींच्या वानाडोंगरी येथील योजनेत फ्लॅट खरेदी केला आहे. धुमाळ यांनी आरोपींना ३६ कोरे धनादेश दिले होते. त्या धनादेशाद्वारे आरोपींनी धुमाळ यांच्या बँक खात्यातून प्रत्येक महिन्यात एक हजार रुपये काढून घेण्याचे ठरले होते. धुमाळ यांच्यासोबत संबंध चांगले असताना आरोपींनी १५ महिन्यांपर्यंत कराराचे पालन केले. संबंध बिघडल्यानंतर आरोपींनी ४ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश बँकेत सादर केला. तसेच, अन्य एका धनादेशाचाही दुरुपयोग केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे २००३ मध्ये धुमाळ यांनी जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. प्रकरणावर १४ वर्षांनंतर निकाल आला.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर