वाहनचोरट्यांच्या टोळीच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, सहा गुन्ह्यांची उकल
By योगेश पांडे | Updated: August 30, 2024 16:43 IST2024-08-30T16:42:40+5:302024-08-30T16:43:12+5:30
Nagpur : पोलिसांनी गुन्हा दाखल केला व गुन्हे शाखेचे पथकदेखील तपास करणार

Six crimes were solved by the crime branch of the gang of vehicle thieves
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पोलिसांनी वाहनचोरट्यांच्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या चौकशीतून सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींमध्ये दोन सख्ख्या भावांचादेखील समावेश आहे. गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
२१ ऑगस्ट रोजी राजेश खापेकर यांची दुचाकी ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंटखाना कब्रस्तानच्या प्रवेशद्वाराजवळून चोरी गेली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता व गुन्हे शाखेचे पथकदेखील तपास करत होते. सीसीटीव्ही व इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणात लक्ष्मीकांत उर्फ आकाश संजयराव निनावे (२९, शक्तीमातानगर, नंदनवन), शशिकांत संजयराव निनावे हे दोघे सख्खे भाऊ तसेच अंकीत कृष्णा रेहपाडे (२४, किर्तीधर सोसायटी) व सय्यद सर्फराज हुसैन सय्यद बब्बू हुसैन (४७, औलीयानगर) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी शहरातून विविध ठिकाणांहून वाहन चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून एमएच ४९ एच ०४५१, एमएच ३१ बीआर ५२६०, एमएच ३६ एम ९१२५, एमएच ४० एएल २९२४, एमएच ३१ बीटी २४१६ व एका दुचाकीचे सुटे पार्ट्स जप्त करण्यात आले. आरोपींना ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.