नागपुरात बहिणीची छेड काढणाऱ्याची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:36 PM2019-08-13T23:36:56+5:302019-08-13T23:38:20+5:30

नंदनवन झोपडपट्टीमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या बहिणीची छेड काढणाऱ्या शेजाऱ्याची हत्या केली. ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा आठवड्याभरानंतर शवविच्छेदन अहवालातून खुलासा झाला.

Sister's molester murdered in Nagpur | नागपुरात बहिणीची छेड काढणाऱ्याची केली हत्या

नागपुरात बहिणीची छेड काढणाऱ्याची केली हत्या

Next
ठळक मुद्देआठवड्याभरानंतर झाला खुलासा : आरोपी विद्यार्थ्याला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन झोपडपट्टीमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या बहिणीची छेड काढणाऱ्या शेजाऱ्याची हत्या केली. ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा आठवड्याभरानंतर शवविच्छेदन अहवालातून खुलासा झाला. पोलिसांनी आरोपी हेमंत रामभाऊ खडसे (२०) रा. नंदनवन झोपडपट्टी याला अटक केली आहे. मृत शैलेंद्र मारोतराव गुज्जनवार (४४) हा सुद्धा येथेच राहतो.
शैलेंद्र वाहन चालक होता तर हेमंत हा बी कॉमच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. शैलेंद्र अविवाहित असल्याने एकटाच राहत होता. हेमंतची बहीण प्रसुतीसाठी माहेरी आली होती. ५ ऑगस्टला शैलेंद्रने त्याच्या बहिणीची छेड काढली. त्यामुळे हेमंत संतापला. त्याने शैलेंद्रला जाब विचारला असता, शैलेंद्रने त्याला मारपीट केली. त्यामुळे संताप अनावर झाल्याने हेमंतने शेलेंद्रच्या डोक्यावर वार केला. शैलेंद्र बेशुद्ध झाला. नशेत असल्यामुळे पडला असेल, असे वाटल्याने हेमंत तेथून निघून गेला. ६ ऑगस्टला सकाळी शुद्ध आल्यानंतर शैलेंद्रने शेजारच्या महिलेला दही मागितले. दही खाऊन तो पुन्हा झोपला. दुपारी शैलेंद्रचा मोबाईल सातत्याने वाजत होता. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेजारच्या महिलेला संशय आला. तिने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना केली. नंदनवन पोलीस तिथे पोहचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दरम्यान मंगळवारी शवविच्छेदनाचा अहवाल आला. त्यात गळा आवळून व डोक्यावर मार लागल्याने शैलेंद्रचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला व हेमंतला ताब्यात घेऊन विचारणा केली असता घटनाक्रम पुढे आला.

Web Title: Sister's molester murdered in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.