लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचा निवडणूक आयोगाने २९ मार्चपर्यंतचा सविस्तर आढावा घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा कमी पडताळणी पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना 'रेड झोन'मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. या यादीत राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर तसेच सांस्कृतिक राजधानी पुणेसह राज्यातील १० जिल्ह्यांचा समावेश आहे.
या मोहिमेत २००२ च्या मतदार यादीतील नावे आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील अंतिम मतदार यादीतील नोंदी यांची ताळमेळ तपासणी बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) स्तरावर केली जात आहे. मतदार यादीतील मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट किंवा चुकीच्या नोंदी शोधून अद्ययावत आणि शुद्ध मतदार यादी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशभरात एसआयआर प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून झालेल्या आढाव्यात काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गतीने काम होत असल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यासह मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, ठाणे, पालघर, सोलापूर, रायगड, सांगली आणि नाशिक या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश आहे.
गडचिरोलीचा आदर्श ठरणारा नमुना
याउलट, दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असूनही गडचिरोली जिल्ह्याने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बीएलओ, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून घराघरात पोहोचून पडताळणीचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले. ग्रामीण भागातील संघटित यंत्रणा आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमुळे गडचिरोलीचा नमुना राज्यासाठी आदर्श ठरत आहे. गडचिरोलीसोबतच हिंगोली, बुलडाणा, परभणी आणि नांदेड ही जिल्हे टॉप फाइव्ह ठरली आहेत.
'रेड झोन' जिल्ह्यांना विशेष सूचना
निवडणूक आयोगाने रेड झोन जिल्ह्यातील संबधित अधिकाऱ्यांना तातडीने गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कमी प्रगती असलेल्या मतदारसंघांमध्ये कामाला गती देत अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेड झोनमधील जिल्हे पडताळणीचे काम (टक्के)मुंबई उपनगर २४.४१ टक्केपुणे २५.७८ टक्केठाणे २७.२४ टक्केनागपूर २८.८८ टक्केपालघर ३५.३५ टक्केमुंबई शहर ३६.२६ टक्केसोलापूर ४२.११ टक्केरायगड ४५.०७ टक्केसांगली ४६.०३ टक्केनाशिक ४७.३५ टक्के
टॉप फाइव्ह जिल्हे
गडचिरोली - ८२.१६ टक्केहिंगोली - ८१.९२ टक्केबुलडाणा - ७७.३२ टक्केपरभणी - ७३.५८ टककेनांदेड - ७३.५७ टक्के
Web Summary : Mumbai, Nagpur, and eight other districts are in the 'Red Zone' due to slow progress in voter list verification. Gadchiroli leads with the best performance. Election Commission directs concerned officials to expedite the process.
Web Summary : मतदाता सूची सत्यापन में धीमी प्रगति के कारण मुंबई, नागपुर और आठ अन्य जिले 'रेड जोन' में हैं। गडचिरोली सर्वश्रेष्ठ प्रदर्शन के साथ आगे है। चुनाव आयोग ने संबंधित अधिकारियों को प्रक्रिया में तेजी लाने का निर्देश दिया है।