शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात एसआयआर लागू करण्याचा घाट ; नाना पटोले यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:41 IST

Nagpur : गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणसं मेलेली दाखवतात. सर्वोच्च न्यायालयात हे सर्व समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातही बिहारच्या धर्तीवर एसआयआर लागू करण्याचा घाट निवडणूक आयोगाने घातला आहे. राज्य निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तसे तोंडी आदेश दिले आहेत. येत्या १५ दिवसांत २००० सालची यादी बीएलओ, तहसीलदार आणि एसडीओकडून मागवण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप काँग्रेस नेते आ. नाना पटोले यांनी केला. या सर्व मतदार याद्या ग्रामपंचायतस्तरावर आधी जाहीर कराव्या नंतरच मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणसं मेलेली दाखवतात. सर्वोच्च न्यायालयात हे सर्व समोर आले आहे. हा मोदीचा फंडा आहे. आपल्या विचाराची मतं ठेवून बाकी नावे काढून टाकायची हा भाजपचा फंडा आहे. मत चोरी सुरू आहे, यावर लोकांनी जागरूक व्हावे. निवडणुका पारदर्शक व्हाव्या, असेही पटोले म्हणाले. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा कोणाचा नातेवाईक असेल. पुतळ्याची विटंबना केली, याचा निषेध करतो. हे राज्य सरकारचे अपयश आहे. ते विषयाला डायव्हर्ट करत आहेत. 

भुजबळ यानी नौटंकी सोडावी

छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. भांडण लावून महाराष्ट्र विकला जात आहे. स्कॉलरशिप दिल्या जात नाही, जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा, काय निर्णय घ्यायचा हे भुजबळ यांनी ठरवावे. सामाजिक असमतोल बिघडवण्याचे काम सरकार करत आहे. यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे आहेत. भुजबळ यांनी आता नौटंकी करणे सोडावे. निर्णय काय घ्यायचा तो घ्या; पण जनतेची दिशाभूल करू नका, अशी टीकाही पटोले यांनी केली. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूरcongressकाँग्रेस