चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 8, 2025 19:51 IST2025-06-08T19:50:29+5:302025-06-08T19:51:51+5:30

सोमवार, ९ जून रोजी खुलत्या बाजारात चांदीचे भाव किती वाढतील, याकडे सराफांचे लक्ष लागले आहे.

Silver price hits record high; up Rs 8,400 in a week; Rs 1,09,283 with 3 percent GST | चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये

चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये

- मोरेश्वर मानापुरे

नागपूर : गेल्या आठवड्यात प्रति किलो शुद्ध चांदीचे भाव ८,४०० रुपयांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढल्याने तेजीला पाठिंबा मिळाला आणि दरदिवशी चांदीचे भाव वाढून शनिवार, ७ जून रोजी १,०६,१०० रुपयांवर स्थिरावले.

सराफांकडे ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपयांत विकली गेली. दुसरीकडे दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ६०० रुपयांनी वाढून जीएसटीविना ९६,२०० रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्यात २ जून रोजी चांदीचे भाव ३१ मेच्या तुलनेत २,६०० रुपयांनी वाढून जीएसटीविना १,००,३०० रुपयांवर पोहोचले. ३ जूनला १,६०० रुपयांची वाढ झाली. ४ जूनला मागणीअभावी भाव स्थिर होते.

५ जून रोजी चांदीच्या भावात तब्बल ४,२०० रुपयांची वाढ झाली आणि भावपातळी १,०६,१०० रुपयांवर पोहोचली. ६ जून रोजी भाव पुन्हा ४०० रुपयांनी वाढले. मात्र, शनिवार, ७ जून रोजी चांदी ४०० रुपयांनी घसरून १,०६,१०० रुपयांवर स्थिरावली. सोमवार, ९ जून रोजी खुलत्या बाजारात चांदीचे भाव किती वाढतील, याकडे सराफांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Silver price hits record high; up Rs 8,400 in a week; Rs 1,09,283 with 3 percent GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Silverचांदी