शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

स्पेशल आॅलिम्पिकमध्ये जिंकले रजत आणि कांस्यपदक

By admin | Updated: August 7, 2015 02:40 IST

अश्विनी इतर मुलांसारखी सामान्य नव्हती. निसर्गाने तिच्या बौद्धिक विकासात कमतरता ठेवली होती.

अश्विनीची गगनभरारी रिता हाडके  नागपूरअश्विनी इतर मुलांसारखी सामान्य नव्हती. निसर्गाने तिच्या बौद्धिक विकासात कमतरता ठेवली होती. मात्र जिद्द आणि मेहनतीच्या भरवशावर अश्विनीने असामान्य कामगिरी करीत सर्वांना थक्क करणारी गगनभरारी घेतली. संत्रानगरीच्या दिव्यज्योती मतिमंद स्पेशल शाळेची १९ वर्षीय अश्विनी अटाळकर हीच ती स्पेशल मुलगी. अश्विनीने मतिमंदपणावर मात करीत अमेरिकेच्या लॉस एंजेलिस -कॅलिफोर्निया येथे नुकत्याच झालेल्या ‘स्पेशल आॅलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स’मध्ये रजत आणि कांस्यपदक पटकावले. आॅलिम्पिकमधल्या रनिंग आणि गोळाफेक स्पर्धेत तिने ही कामगिरी केली. तिच्या गगनचुंबी यशाने अशक्य असे काहीच नाही, हेच दाखवून दिले.मेहनतीने मिळाले यशभारतीय संघटनांकडून स्पेशल आॅलिम्पिक वर्ल्ड समर गेम्ससाठी जेव्हा अश्विनीची निवड केली तेव्हाच विजय मिळविण्याचा संकल्प तिने केला. स्पर्धेसाठी दिवस-रात्र प्रॅक्टिस करून अश्विनीने हे असामान्य यश मिळविले. लॉस एंजेलिस-कॅलिफोर्निया येथे झालेल्या स्पेशल आॅलिम्पिक वर्ल्ड समर गेम्समध्ये अश्विनीने १०० मीटर दौड स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रजतपदक जिंकले, तर गोळाफेक स्पर्धेत तिसऱ्या स्थानी येऊन कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी झाली. याशिवाय ४ बाय १०० मीटर रिले दौड स्पर्धेत चौथ्या स्थानी येणाऱ्या भारतीय दलाची ती सदस्य ठरली. स्पर्धेत जगातील विविध देशांच्या सात हजार स्पर्धकांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या यशामुळे अश्विनीच्या आनंदाला पारावार उरला नाही. लोकमतशी बोलताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. शाळेतील मैत्रिणींकडूनही तिचे अभिनंदन केले जात आहे. देशाला दिले सुवर्णपदकविशाल नाईक यांच्या मार्गदर्शनात सॉफ्ट बॉल स्पर्धेमध्ये भारतीय दलाने सुवर्णपदक जिंकले.आई-वडिलांची चिंता मिटलीकाहीच दिवसांपूर्वी अश्विनीचे वडील विनायक अटाळकर व आई आशा यांना तिच्या भविष्याची मोठी चिंता लागली होती. ती मतिमंद राहू नये म्हणून त्यांनी असंख्य प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी अश्विनीला गुमथी येथील दिव्यज्योती मतिमंद स्पेशल शाळेत दाखल केले आणि येथूनच तिच्या खेळाला नवी उभारी मिळाली. पंतप्रधान घेणार अश्विनीची भेटदिव्यज्योती मतिमंद स्पेशल शाळेचे कोच विशाल नाईक यांनी सर्व विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केल्याचे सांगितले. तारीख निश्चित झाल्यानंतर अश्विनी त्यांच्या भेटीला दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.