शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

२४,८९० वाहनचालकांनी तोडले सिग्नल

By admin | Updated: February 16, 2015 02:13 IST

वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे.

वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. सिग्नल तोडल्यावर सापडल्यास अत्यंत किरकोळ दंड होतो. वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्यानेच याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षात पूर्व वाहतूक शाखेंतर्गत ५६४२ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. यांच्याकडून ५,२४,४०० रुपये वसूल करण्यात आले. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गंत ८२०४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले तर यांच्याकडून ८,९५,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पश्चिम वाहतूक शाखेंतर्गत ५०३७ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून ७,९१,५०० रुपये वसूल करण्यात आले. एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गंत २३९४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून २,४१,८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. इंदोरा वाहतूक शाखेंतर्गंत २३८९ वाहनचालकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून २,२१,२०० रुपये वसूल करण्यात आले. तर उत्तर वाहतूक शाखेंतर्गंत सर्वात कमी म्हणजे १२२४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून १,२०,३०० रुपये वसूल करण्यात आले. वाहतूक सिग्नल तोडण्यात खासगी व एसटी बसही मागे नाहीत. गेल्या पाच वर्षांत सर्वात जास्त पश्चिम वाहतूक शाखेंतर्गंत येणाऱ्या वाहतूक सिग्नलवरील या बसचालकांकडून सिग्नल तोडण्यात आले. याची संख्या २५४ आहे. त्यानंतर पूर्व वाहतूक शाखेंतर्गंत २१४ बसचालकांनी सिग्नल तोडले. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गंत १६४, इंदोरा वाहतूक शाखेंतर्गंत ४८ तर एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गत फक्त ४ बसचालकांनी सिग्नल तोडले. एकूण ७२,१०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे, उत्तर वाहतूक शाखेंतर्गत बसचालकांकडून एकही सिग्नल तोडले नसल्याची नोंद आहे. (प्रतिनिधी)