शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शुभम मेश्राम, निकिता राऊत महामॅरेथॉन विजेते ; लोकमत नागपूर महामॅरेथॉनला ‘महाप्रतिसाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:01 IST

नागपूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी (दि.११) ‘लोकमत’ने कस्तूरचंद पार्क येथे आयोजित केलेल्या ‘नागपूर महामॅरेथॉन’ला शहरवासीयांसोबत देशभरातील धावपटूंचा ‘महाप्रतिसाद’ लाभला.

नागपूर : नागपूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी (दि.११) ‘लोकमत’ने कस्तूरचंद पार्क येथे आयोजित केलेल्या ‘नागपूर महामॅरेथॉन’ला शहरवासीयांसोबत देशभरातील धावपटूंचा ‘महाप्रतिसाद’ लाभला. यासोबतच ‘लोकमत समूहा’बद्दल लोकांमध्ये असलेल्या निस्सीम प्रेमावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. लोकमतच्या पुढाकाराने भोजवानी फूडस् प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉनमध्ये विविध राज्यांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच आबालवृद्धांनी सहभाग घेऊन ‘हम भी किसी से कम नहीं’हे दाखूवन दिले. नागपूरचे शुभम मेशाम आणि निकिता धावपटू यांनी २१ किमी अंतराच्या खुल्या गटात पुरुष आणि महिलांमध्ये अव्वल स्थान पटकवित महामॅरेथॉनचे विजेते होण्याचा मान मिळविला.‘मी धावतो माझ्यासाठी’ या जनभावनेचा ‘याचि देही, याचि डोळा’अनुभव या महामॅरेथॉनमध्ये पाहायला मिळाला. महिनाभरापासून प्रतीक्षा लागलेल्या उत्कंठावर्धक महामॅरेथॉनमध्ये नागरिकांचा उत्साह द्विगुणित होता. खेळाडूंनी रविवारी पहाटे-पहाटे कस्तूरचंद पार्कवर जमण्यास सुरुवात केली. मॅरेथॉनमध्ये धावण्याची ऊर्मी एवढी की, पहाटेच्या थंडीचाही त्यांच्यावर काही परिणाम जाणवत नव्हता.हजारोंच्या संख्येने जमलेल्या धावपटूंनी ‘रिलॅक्स झिल’ग्रुपसोबत संगीताच्या धूनवर बहारदार ‘वॉर्मअप’ केल्यानंतर एकापाठोपाठ चारही गटातील शर्यतींना प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खा. विजय दर्डा, खा. कृपाल तुमाने, खा. विकास महात्मे, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख आणि अनिस अहमद, माजी खा. नाना पटोले, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, अभिजित ग्रुपचे मनोज जैस्वाल, मुख्य प्रायोजक आकाश भोजवानी, राजाभाऊ टांकसाळे यांच्या उपस्थितीत स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखविण्यात आली.शर्यती आटोपल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, खा. डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. आशिष देशमुख, आ. डॉ. परिणय फुके, आ. गिरीश व्यास, आ. प्रा.अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी महापौर विकास ठाकरे, भोजवानी ग्रुपचे सीईओ आकाश भोजवानी, नाशिक येथील फॉर्च्युन फूड लि.चे संचालक नरेश गुप्ता, महाव्यवस्थापक सुहास कुळकर्णी, कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर संचालक श्रवण कुकरेजा व रितू कुकरेजा, विम्स हॉस्पिटलचे एमडी डॉ. राजेश सिंघानिया, एसआयईएमचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. क्षीरसागर, रिझोनन्सचे बिझनेस हेड तनजितसिंग छाबरा, नेल्सन हॉस्पिटलचे संचालक अमित जैन आणि संयुक्त मेडिकल संचालक डॉ. संजय देशमुख, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खा. विजय दर्डा, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. महाव्यवस्थापक आशिष जैन यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राकाँचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा, सुरक्षा उपायुक्त दिनेशसिंग तोमर, दमपू रेल्वेचे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, रामटेकचे पोलीस उपअधीक्षक लोहित मतानी, कन्हानचे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, सीआरपीएफचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे, केईसी इंटरनॅशनल लिमिटेडचे वरिष्ठ मनुष्यबळ अधिकारी प्रदीप राऊत, ट्रीट आईस्क्रीमचे अमोल चकनलवार व मंजूषा चकनलवार, केडीके नागपूर पॉलिटेक्निकचे प्राचार्य विनय बाबर, अतुल कोटेचा, शैलेंद्र मरोटी, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर आदींची उपस्थिती होती.यावेळी व्यासपीठावर भोजवानी ग्रुपच्यावतीने मल्टिग्रेन आटा, क्लासिक आटा आणि प्रीमियम चक्की फ्रेश आटा ही तीन नवीन उत्पादने पाहुण्यांच्या हस्ते ‘लाँच’ करण्यात आली. फॉर्च्युन फूडस्चे (फ्रूटेक्स चिप्स) हे उत्पादनही यावेळी लाँच करण्यात आले.सर्वोत्तम आयोजन : मोहम्मद इद्रिसलोकमत महामॅरेथॉनमध्ये देशातील दिग्गज धावपटूंनी प्रवेश नोंदवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चेन्नईचा मोहम्मद इद्रिसने स्पर्धा आयोजनाची प्रशंसा केली. लोकमत समूहाने हा इव्हेंट आयोजित करण्यात पुढाकार घेत शहरामध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई येथील धावपटू मोहम्मद इद्रिसने व्यक्त केली. यापूर्वीही मी अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झालो, पण या इव्हेंटचे आयोजन सर्वोत्तम होते, असेही इद्रिस म्हणाला. भविष्यातही लोकमततर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास प्राधान्य राहील. रेसदरम्यान प्रत्येक टप्प्यावर झालेले स्वागत संस्मरणीय होते, असेही त्याने यावेळी सांगितले. मोहम्मद इद्रिस म्हणाला,‘चेन्नईहून नागपूरमध्ये दाखल झालो आणि २१ किलोमीटर अंतराच्या अर्धमॅरेथॉनमध्ये प्रौढ गटात तिसरे स्थान पटकावले. मी सहभागी झालेल्या रेसमध्ये हा एक सर्वोत्तम आयोजन असलेला इव्हेंट होता. स्पर्धेचा मार्ग उत्तम होता. लोकमत समूहाने हा इव्हेंट आयोजित करीत नागपूरमध्ये स्पोर्टिंग वातावरण निर्माण केले.’नागपूरचा शुभम ठरला वेगवान धावपटू-खुल्या गटात अव्वल आलेला नागपूरचा शुभम मेश्राम कस्तूरचंद पार्कवर रविवारी झालेल्या लोकमत नागपूर महामॅरेथॉनचा खºया अर्थाने वेगवान धावपटू ठरला. त्याने २१ कि.मी. अंतर एक तास १३ मिनिटे आणि १२ सेकंदात पूर्ण केले.राज्य स्पर्धेत रौप्याचा मानकरी असलेला शुभम स्थानिक नव महाराष्टÑ क्रीडा मंडळाचा सदस्य आहे. विक्की राऊत आणि किशोर खडसे हे अनुक्रमे दुसºया आणि तिसºया स्थानी आले.महिलांच्या खुल्या गटात नागपूरची निकिता राऊत हिने एक तास २५ मिनिटे ५१ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकविले.औरंगाबादमध्ये प्रथम स्थान पटकविणारी प्राजक्ता गोडबोले (१.३२.१५) हिला दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिची बहीण प्राची गोडबोले हिने तिसरे स्थान मिळवले.डिफेन्स गटात जीआरसी कामठीचा दीपचंद यादव याने एक तास १५ मिनिटे ५२ सेकंदांची वेळ नोंदवीत अव्वल स्थानावर झेप घेतली. मोहम्मद महारुफ आणि अशोक कुमार दुसºया तसेच तिसºया स्थानी राहिले. याच गटात महिलांमध्ये शोभा देसाई, अंकिता मेनन आणि अश्विनी देवरे यांनी क्रमश: पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले.२१ कि.मी. ज्येष्ठांच्या पुरुष गटात विवेक काळबांडे अव्वल स्थानी राहिला. एल.के. यादव दुसºया आणि चेन्नईचे मोहम्मद इद्रिस तिसºया स्थानी आले. ज्येष्ठ महिलांच्या गटात प्रियंका पाठक आणि चंपाबेन लटारिया यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकविले.१० कि.मी. खुल्या गटात पुरुषांमध्ये नागपूरचा संदेश शेबे आणि महिला गटात नागपूरचीच ऋतुजा शेंडे यांनी अव्वल स्थानासह वर्चस्व गाजविले. प्रौढांमध्ये शिवशंकर पाल आणि महिलांमध्ये माजी आंतरराष्टÑीय धावपटू विद्या (देवघरे) धापोडकर यांनी बाजी मारली.विविध शहरांतील धावपटू झाले सहभागीलोकमत महामॅरेथॉनमध्ये विविध शहरांतील धावपटूंनी सहभाग नोंदवत बक्षिसांची लयलूट केली. चेन्नई, भोपाळ, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद आदी शहरांतील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले, तर राज्यातील मुंबई, नाशिक, सांगली, सातारा, अकोला, लातूर, परभणी, नांदेड, उदगीर, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी शहरांसह ग्रामीण भागातील धावपटू सहभागी झाले होते.पाच, तीन कि.मी. शर्यतींना ‘धम्माल गर्दी’सर्वाधिक लक्षवेधी ठरल्या त्या पाच आणि तीन कि.मी. शर्यती. सर्वच वयोगटातील धावपटू आणि सामान्य नागरिकांसह तरुणांना लाजविणारे वयोवृद्ध, कुटुंबीय, बच्चेकंपनींनी या दोन्ही शर्यतींना भरभरून प्रतिसाद दिला. कापडी फलक आणि लक्षवेधी घोषणांसह धावपटूंनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.२१ कि.मी. शुभम मेश्राम, निकिता राऊत विजेते-पुरुष (खुला गट) : १. शुभम मेश्राम (१.१३.१२) २. विक्की राऊत (१.१५.२०) ३. किशोर खडसे (१.२०.४४)महिला (खुला गट) : १. निकिता राऊत (१.२५.५१) २. प्राजक्ता गोडबोले (१.३२.१५) ३. प्राची गोडबोले (१.३५.२१)डिफेन्स गट (पुरुष) : १. दीपचंद यादव (१.१५.५२), २. मोहम्मद महारुफ (१.१६.५०), ३. अशोक कुमार (१.२४.५६)डिफेन्स गट (महिला) : शोभा देसाई (१.४८.२१) २. अंकिता मेनन (२.००.४४) ३. अश्विनी देवरे (२.०४.२०)प्रौढ गट (पुरुष) : १. विवेक काळबांडे २. एल. के. यादव ३. मोहम्मद इद्रिसप्रौढ गट (महिला) : १. प्रियंका पाठक २. चंपाबेन लटारिया

टॅग्स :nagpurनागपूरMarathonमॅरेथॉन