श्री शिवमने गुरुद्वारा येथे साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:10+5:302020-12-04T04:22:10+5:30
नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठी फॅशन स्टोअर चेन श्री शिवमच्या संचालकांनी रामदासपेठ येथील गुरुद्वारा येथे गुरुनानक जयंती उत्साहात ...

श्री शिवमने गुरुद्वारा येथे साजरी
नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठी फॅशन स्टोअर चेन श्री शिवमच्या संचालकांनी रामदासपेठ येथील गुरुद्वारा येथे गुरुनानक जयंती उत्साहात साजरी केली आणि प्रसाद वितरण केले. या प्रसंगी संचालकांनी सर्वांसाठी उत्तम आरोग्याची प्रार्थना केली. श्री शिवमतर्फे दरवर्षी गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. पण कोरोना महामारीमुळे यंदा गुरुद्वारा येथे जाऊन शांततेत साजरी केली. या कार्यक्रमात श्री शिवमच्या संपूर्ण चमूने सेवाभावाने प्रसाद वितरण केले आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. येथे वेळोवेळी विविध प्रकारचे फॅशन आणि वेडिंग परिधानाची विभिन्न रेंज आणि कलेक्शन उपलब्ध करून देण्यात येते. विशेषत: लाचा, घागरा चोली, लेहंगा आदी वैवाहिक परिधानांची विशिष्ट रेंज ग्राहकांना पसंत येत आहे. याशिवाय विशेषरीत्या वधूचा घागरा आणि लग्नाचा उत्सव ध्यानात ठेवून फ्रेश कलेक्शन उपलब्ध करण्यात येत आहेत. श्री शिवम स्टोअर मुंजे चौक, सीताबर्डी येथील फॉर्च्युन मॉलमध्ये आहे. (वा.प्र.)