मनपा बैठकीत अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा : स्थायी समिती अध्यक्ष झलके यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 23:52 IST2020-10-16T23:50:01+5:302020-10-16T23:52:31+5:30
NMC Nagpur news समितीची बैठक शुक्रवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत चर्चा होऊ शकली नाही. यामुळे झलके अतिशय नाराज झाले. त्यांनी बैठकीत अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

मनपा बैठकीत अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा : स्थायी समिती अध्यक्ष झलके यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी बांधकामाचे नकाशे मंजूर करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महापौर संदीप जोशी यांनी समिती गठित केली होती. या समितीची बैठक शुक्रवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत चर्चा होऊ शकली नाही. यामुळे झलके अतिशय नाराज झाले. त्यांनी बैठकीत अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
झलके यांनी दुपारी १२ वाजता बैठकीचे आयोजन केले होते. याची सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आली होती तरी पण अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बैठकीचे सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांना अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती अभय गोटेकर, बसपा पक्षनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते.