शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही फटका

By admin | Updated: September 17, 2014 00:58 IST

आॅटोवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेल्या दुसऱ्या दिवसाच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपाचा सर्वात जास्त फटका आॅटोने

आॅटो बंदला संमिश्र प्रतिसाद : प्रवाशांचे हालनागपूर : आॅटोवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात तीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेल्या दुसऱ्या दिवसाच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपाचा सर्वात जास्त फटका आॅटोने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह सीताबर्डी ते व्हेरायटी चौकातून इतरत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. विशेष म्हणजे, एकीकडे संप सुरू असताना दुसरीकडे विनामीटर धावत असलेल्या १५ आॅटोंवर आरटीओने जप्तीची कारवाई केली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आज बोलविलेल्या आॅटो संघटनेच्या बैठकीत कारवाईमध्ये शिथिलता आणण्याची सूचना केली.आरटीओकडून तीन सीटर आॅटोचालकांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात समितीने दोन दिवस आॅटो बंदचा इशारा दिला होता. सोमवारी पहिल्या दिवशी सुमारे ८० टक्के आॅटोचालक यात सहभागी झाले होते, मात्र आज मंगळवारी सीताबर्डी, व्हेरायटी चौकासह काही महत्त्वाचे चौक सोडल्यास अनेक ठिकाणी प्रवासी घेऊन आॅटो धावताना दिसून आले. मात्र विद्यार्थ्यांची ने-आण करणारे आॅटो दुसऱ्या दिवशीही बंद होते. यामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानकावर आॅटोरिक्षा फार कमी प्रमाणात होते. दरम्यान, आॅटोरिक्षा चालकांच्या मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आॅटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. यावेळी आरटीओ व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह कामगार नेते मोहनदास नायडू, समितीचे महासचिव हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे, चरणदास वानखेडे, कैलाश श्रीपतवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)१५ आॅटोंवर जप्तीची कारवाई ॉटोचालकांचा संप सुरू असताना मीटरनुसार न चालणाऱ्या आॅटोंवर आरटीओचा कारवाईचा धडाका सुरूच होता. मंगळवारी १५ आॅटोरिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत ४०५ आॅटोंवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.आॅटोचालकांचा जल्लोषतीन सीटर आॅटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याच्या निमित्ताने गणेशपेठ येथे आॅटोचालकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी कामगार नेते मोहनदास नायडू, समितीचे महासचिव हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली.दोन-तीन प्रवासी आॅटोंवर कारवाईत शिथिलताआॅटोंमध्ये दोन किंवा तीन प्रवासी असेल तर कारवाईत शिथिलता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओ आणि वाहतूक विभागाला दिल्याची माहिती आहे. मात्र आॅटो मीटरनेच चालेल यावरही भर दिला.‘कॅलिब्रेशन’चा आढावा घेणारजिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओला २५ तारखेपर्यंत किती आॅटोचालकांनी मीटरमध्ये बदल (कॅलिब्रेशन) करवून घेतले, याचा आढावा घेण्यास सांगितले. त्यानंतरच नियमानुसार निर्णय घेण्याची सूचना केली.