माेवाड येथे ॲन्टिजेन टेस्टिंग कीटचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:30+5:302021-04-30T04:10:30+5:30
माेवाड : स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्र येथे ॲन्टिजेन काेविड टेस्टिंग कीटचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर ...

माेवाड येथे ॲन्टिजेन टेस्टिंग कीटचा तुटवडा
माेवाड : स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्र येथे ॲन्टिजेन काेविड टेस्टिंग कीटचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर रिपाेर्ट मिळण्यास ४ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने रुग्णांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आराेग्य विभागाने टेस्टिंग कीट उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांची आहे.
वाढत्या काेराेनाला राेखण्यासाठी आराेग्य विभागातर्फे लसीकरण व काेविड चाचणीला वेग दिला आहे. माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्रात ॲन्टिजेन व आरटीपीसीआर या दाेन्ही चाचण्या केल्या जात आहेत. परंतु ॲन्टिजेन टेस्टिंग कीट संपल्यामुळे तपासणी प्रक्रिया थांबली आहे. दुसरीकडे आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर रिपाेर्टसाठी ४ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागते. यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णदेखील मुक्तपणे संचार करीत असल्याने संसर्गाचा धाेका वाढला आहे. त्यामुळे आराेग्य केंद्रात दरराेज किमान ५०० ॲन्टिजेन टेस्ट कीट उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांची आहे.
याबाबत तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत विरखंडे यांना विचारणा केली असता, जिल्हा आराेग्य विभागाकडे ॲन्टिजेन टेस्ट कीटची मागणी केली आहे. त्या उपलब्ध हाेताच प्राथमिक आराेग्य केंद्राला पुरविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.