नागपुरात दुकाने उघडली, ग्राहकांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 21:14 IST2020-06-03T21:11:12+5:302020-06-03T21:14:07+5:30

राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरात तीन टप्प्यात सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बुधवारी पहिल्या टप्प्यात मॉल आणि कॉम्प्लेक्स वगळता दुकाने सुरू झाली.

Shops opened in Nagpur, enthusiasm among customers | नागपुरात दुकाने उघडली, ग्राहकांमध्ये उत्साह

नागपुरात दुकाने उघडली, ग्राहकांमध्ये उत्साह

ठळक मुद्दे‘ऑड’ -‘ईव्हन’ फार्म्युला लागू : पहिला टप्प्यात बरीच सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरात तीन टप्प्यात सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बुधवारी पहिल्या टप्प्यात मॉल आणि कॉम्प्लेक्स वगळता दुकाने सुरू झाली.
‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रात प्रतिबंध कायम आहे. नवीन आदेशानुसार एका दिवशी रस्त्याच्या एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू राहील. ‘आॅड’ तारखेला उत्तर ते पूर्व व दक्षिण ते पूर्वेकडील दुकाने तर ‘ईव्हन’ तारखेला उत्तर ते पश्चिम व दक्षिण ते पश्चिमेकडे तोंड असलेले दुकाने उघडी राहतील. त्यानुसार दुकाने उघडण्यात आली. आयुक्तांनी १ जून रोजी जारी केलेल्या पाचव्या लॉकडाऊन संदर्भात नियमावलीनुसार दुकाने सुरू करण्यात आली.

पहिला टप्प्यात सुरू झालेल्या बाबी
सवलतीनुसार सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगिचांमध्ये, खासगी मैदानांवर, सोसायटी तसेच संस्थात्मक मैदानांवर, बगिचे या ठिकाणी सकाळी ५ ते ७ या वेळेत परवानगी.
कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.
प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी
गॅरेज तसेच वर्कशॉप यांना अपॉईंटमेंट पद्धतीने काम करण्याची परवानगी
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचारी वर्ग अथवा १५ कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू.

Web Title: Shops opened in Nagpur, enthusiasm among customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.