बाजारपेठेतील दुकानदारांची काेराेना टेस्ट हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:40+5:302021-05-23T04:08:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : काेराेना संक्रमणाची तिसरी लाट राेखण्यासाठी प्रशासनाने उपाययाेजना करायला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत कामठी शहरातील ...

बाजारपेठेतील दुकानदारांची काेराेना टेस्ट हाेणार
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेना संक्रमणाची तिसरी लाट राेखण्यासाठी प्रशासनाने उपाययाेजना करायला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत कामठी शहरातील सर्व दुकानदारांची काेराेना टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पाेलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी दिली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण १६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा करीत प्रत्येकाला मास्क वापरणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य केले आहे. शिवाय, अत्यावश्यक वस्तूंची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ या काळात सुरू ठेवण्याचे निर्देशही दुकानदारांना देण्यात आले आहेत. मात्र, कामठी शहरातील काही नागरिक व दुकानदार या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्थानिक नगर परिषद प्रशासनाने कामठी (जुनी) व कामठी (नवीन) पाेलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम सुरू केली आहे.
या माेहिमेंतर्गत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांसह मास्क न वापरणाऱ्यांकडून एकूण १६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (दि. २१) करण्यात आली. कामठी शहरातील बाजारपेठेत कार्यरत असलेल्या सर्व दुकानदारांची येत्या दाेन दिवसात ॲंटिजन टेस्ट केली जाणार आहे तसेच ही माेहीम यापुढेही सुरू राहणार आहे, असेही पाेलिस निरीक्षक राहुल शिरे यांनी सांगितले. या माेहिमेत पाेलीस कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी संदीप बाेरकर यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी सहभागी झाले हाेते.