उघड्यावर कचरा टाकल्याने दुकानदाराला ठोठावला तब्बल २० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 22:10 IST2021-12-23T22:09:30+5:302021-12-23T22:10:12+5:30
Nagpur News नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी धंतोली परिसरात दुकानातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने दुकान मालक नानकराम वाधवानी यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

उघड्यावर कचरा टाकल्याने दुकानदाराला ठोठावला तब्बल २० हजारांचा दंड
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी धंतोली परिसरात दुकानातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने दुकान मालक नानकराम वाधवानी यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
पथकाने ३५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तीन प्रतिष्ठानांवर कारवाई करून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच दहा झोन अंतर्गत ५२ पतंग दुकानांची तपासणी करण्यात आली. प्लॅस्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा संदर्भात दोन झोनमध्ये कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात झोन शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.
......