शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

धक्कादायक ! ‘बाजीराव’ वाघाच्या अवयवाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:53 PM

कळमेश्वर जंगलातील वाघ ‘बाजीराव’चा शवविच्छेदनाच्यादरम्यान अवयव चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खापा वनपरिक्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत वाघिणीचा पंजा कापून घेऊन जाणाच्या प्रयत्नातही हाच डॉक्टर होता, असेही आरोपात नमूद आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदनाच्या दरम्यान एमझेडच्या व्हेटरनरी डॉक्टरवर चोरीचा आरोपमानद वन्यजीव रक्षकाने सीसीटीव्ही फुटेजसह केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमेश्वर जंगलातील वाघ ‘बाजीराव’चा शवविच्छेदनाच्यादरम्यान अवयव चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खापा वनपरिक्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत वाघिणीचा पंजा कापून घेऊन जाणाच्या प्रयत्नातही हाच डॉक्टर होता, असेही आरोपात नमूद आहे. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी हा आरोप केला असून या संदर्भातील तक्रार सीसीटीव्ही फुटेजसह उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. एन. रामबाबू यांच्याकडे केली आहे.२९ डिसेंबर २०१७ रोजी कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील बाजारगाव जवळील राष्ट्रीय  महामार्ग क्र. ६ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने नर वाघ, ‘बाजीराव’चा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी वाघाचे शव नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील‘ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ येथे रात्री आणले. दुसऱ्या  दिवशी ३० डिसेंबर सकाळी १० वाजता शवविच्छेदन होणार असल्याने वाघाच्या शवाला शस्त्रक्रियागृहात सील करून ठेवण्यात आले. नियमानुसार शवविच्छेदन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तीन पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वनाधिकारी यांच्या समक्ष ‘आॅन कॅमेरा’ होणे आवश्यक असते. यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तीन वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदनास हजर राहणार होते. परंतु शवविच्छेदनाच्या दिवशी सकाळी ९.१२ वाजता डॉ. बहार बाविस्कर पोहचले आणि शस्त्रक्रियागृहात जाऊन वाघाच्या शरीराचे मोजमाप घेणे सुरू केले. याच दरम्यान कुंदन हाते तिथे पोहचल्यावर त्यांना हटकले आणि शस्त्रक्रियागृहातून बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी हजर झाल्यानंतर शवविच्छेदन प्रक्रियेला सुरुवात होऊन वाघाच्या शरीराच्या आतील अवयव न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविण्यासाठी ते काढले जात होते. शवविच्छेदन संपल्यानंतर वाघाला बाहेर जाळण्यासाठी नेले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र डॉ. बाविस्कर नव्हते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेसाठी बाटलीत बंद करून ठेवलेले वाघाच्या आतील शरीरातील ११ अवयवाच्या नमुन्यामधील एक बॉटल तिथे नव्हती. याच्या तपासणीसाठी डीसीएफ जी. मल्लिकार्जुन यांच्या परवानगीने सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यात डॉ. बाविस्कर सकाळी ११.५५ वाजता वाघाच्या शरीरातील ‘टेपवर्म’च्या नमुन्याची बॉटल आपल्या बॅगमध्ये भरताना दिसून आले. याची माहिती डीसीएफ आणि कळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांना देण्यात आली.

टॅग्स :TigerवाघCrimeगुन्हा