शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विदर्भात १५ लाख मुलांना दिली सदोष पोलिओ लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 06:57 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा : जुलै २०१७ पासून डोस दिल्याचे स्पष्ट

सुमेध वाघमारे 

नागपूर : सरकारच्या महत्त्वाकांक्षी पोलिओ निर्मूलन मोहिमेत दिलेली लस सदोष असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या लसीच्या वापरावर बंदी घातली असली तरी जुलै २०१७ रोजी याच कंपनीची लस पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील १५ लाख, ६६ हजार बाळांना पाजण्यात आली होती.उत्तर प्रदेशची ‘बायोमेड’ कंपनी लस पुरवित होती. काही मुलांच्या विष्ठेमध्ये पोलिओ विषाणूचे लक्षण आढळले. यामुळे या लसीची चाचणी झाली. त्यामध्ये ‘टाइप-२’ पोलिओ विषाणू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल व केंद्र सरकार यांनी १९७८ पासून पोलिओ निर्मूलन मोहीम हाती घेतली. २००५ पर्यंत देश पोलिओमुक्त करण्याचे ध्येय साध्य झाले नसले तरी पोलिओच्या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे.नागपूर महापालिकेला १९ हजार लसी मिळाल्या. यातील सहा हजार लसींचे वाटप १९ जुलै २०१७ रोजी व १३ हजार लसींचे वाटप १८ आॅगस्ट २०१७ रोजी झाले.

आरोग्य सेवा नागपूर मंडळाच्या उपसंचालकांकडे १ जुलै २0१७ रोजी ‘बायोमेड’च्या ८७ हजार लसी आल्या. नागपूर जिल्ह्यासह गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत त्याचे वितरण केले. वाशिम व यवतमाळमध्येही ही लस लहान मुलांना पाजण्यात आली. एक लस १८ ते २० बाळांना पाजली जाते. त्यामुळे सुमारे १५ लाख ६६ हजार मुलांना डोस दिल्याचे उघड झाले. ही लस मुख्यत्वे उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात वापरली. या कंपनीच्या लसीचा वापर ११ सप्टेंबरपासून महाराष्टÑात थांबविल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जाहीर केले. ‘बायोमेड’ कंपनीच्या लसीचा साठा संपल्याची माहिती आहे. याचे दुष्परिणाम त्याचवेळी दिसले असते, परंतु आता वर्ष झाले आहे. एकही रुग्ण समोर आलेला नाही. यामुळे ती लस दूषित नसावी, तरीही याबाबत चौकशी केली जाईल, असे आरोग्य सेवा संचालक संजीव कांबळे म्हणाले.दुष्परिणाम नाहीही लस दूषित असली तरी त्याचे दुष्परिणाम होत नाहीत, असा निर्वाळा बालरोगतज्ज्ञांनी दिला. मात्र लसीचा पोलिओ प्रतिबंधासाठी उपयोग होईल का, याविषयी शंका आहे. त्यामुळे नव्याने लसीकरण करावे लागू शकते. 

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ