शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

धक्कादायक! अनुदान लाटण्यासाठी घरगुती महिलांची नावे टाकली वारांगनांच्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 10:47 AM

Nagpur News देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांची कोरोना महामारीच्या काळात उपासमार होऊ नये म्हणून सरकारने सानुग्रह अनुदान दिले होते. दलालांनी हे अनुदान लाटण्यासाठी या व्यवसायात नसलेल्या परिचित सर्वसामान्य महिलांची नावे यादीत घुसविली.

ठळक मुद्देउपासमार टाळण्यासाठी वारांगनांना सरकारने दिले होते सानुग्रह अनुदान

मंगेश व्यवहारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी अनुदान लाटण्यासाठी कळस गाठण्याचा प्रकार नागपुरात पुढे आला आहे. देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांची कोरोना महामारीच्या काळात उपासमार होऊ नये म्हणून सरकारने सानुग्रह अनुदान दिले होते. दलालांनी हे अनुदान लाटण्यासाठी या व्यवसायात नसलेल्या परिचित सर्वसामान्य महिलांची नावे यादीत घुसविली. हा गंभीर प्रकार सामान्य महिलांच्या लक्षात आल्याने, या प्रकरणाचा पदार्फाश झाला. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे.शासकीय अनुदानासाठी फसवणुकीचे अनेक प्रकार यापूवीर्ही उजेडात आले आहेत. पण हा प्रकार सामान्य महिलांसाठी बदनामीकारक असल्याने भीतीपोटी कुणीही याची तक्रार विभागाकडे अथवा पोलिसात केलेली नाही. कोरोनाची पहिली लाट रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लावले. त्याचा परिणाम अनेकांचे रोजगार बुडाले. त्याचा परिणाम देहविक्रय करणाऱ्या महिलांवरही झाला. न्यायालयाने याची दखल घेऊन शासनाला त्यांची मदत करण्याचे आदेश दिले. सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाने देहविक्रीच्या व्यवसायात असलेल्या महिलांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्याच्या कालावधीसाठी १५ हजार रुपये व त्यांना १८ वर्षांखालील मूल असेल तर ७,५०० रुपये अनुदान देण्यात आले. त्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून वेश्याव्यवसायात काम करणाऱ्या महिलांचे अर्ज मागविले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने या क्षेत्रात काम करणा?्या काही संस्थांना हे काम दिले होते.

असे फुटले बिंगशासकीय अनुदान लाटण्यासाठी दलालांनी या व्यवसायात नसलेल्या सामान्य घरातील आपल्याच परिचितांना खोटी माहिती देऊन त्यांच्याकडून कागदपत्र गोळा केले. अनुदान मिळाल्यानंतर ५० टक्के रक्कम दलालाने मागितली. संबंधित महिलेच्या खात्यात अनुदान जमा झाल्यानंतर दलालाने महिलेकडून ७५ टक्के रक्कम मागितली. महिलेने ही रक्कम देण्यास नकार दिला व अनुदानासंदर्भात माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. पण हे प्रकरण बदनामी करणारे असल्याने या प्रकरणात महिलांनी चुप्पी साधली.या भागात घडलेत प्रकारशहरातील बाबुळखेडा, नंदनवन, शंभूनगर, मंगलमूर्तीनगर, धम्मदीपनगर या भागातील सामान्य घरातील महिलांसोबत हा प्रकार घडला आहे. पण कुणीही या प्रकरणात पुढे आलेले नाही.- २,७०५ महिलांची यादी विभागाकडेमहिला व बाल विकास विभागाने जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाकडून अशा महिलांची यादी मागितली. या पथकाने २,७०५ महिलांची यादी विभागाकडे पाठविली. विभागाने बँकेकडे ती यादी पाठविली. यातील १५ महिलांनी दिलेल्या माहितीत बँकेला त्रुटी आढळल्याने निधी जमा केला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, व्यवसायात सक्रिय असलेल्या १४०० च्या जवळपास महिला जिल्ह्यात आहेत.- शासनाने दिलेल्या निदेर्शानुसार व एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाकडून आलेल्या यादीनुसार आम्ही कार्यवाही केली आहे.अपर्णा कोल्हे,जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, नागपूर- नागपूर जिल्ह्यात असा कुठलाही प्रकार झालेला नाही. ज्या महिलांची यादी आम्ही महिला व बाल कल्याण विभागाकडे पाठविली आहे, त्या प्रत्येक महिलेची नोंद आमच्याकडे आहे. ज्या महिलांची फसवणूक झाली, त्यांना तुम्ही आमच्याकडे घेऊन या.- फाले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक- यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यासंदर्भात कारवाई करून संबंधित संस्थेला आम्ही ब्लॅकलिस्ट केले आहे. यासंदर्भात नागपुरातूनही तक्रारी आल्यास जिल्हाधिका?्यांच्या माध्यमातून संस्थेवर कारवाई करू.- यशोमती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री

 

टॅग्स :fraudधोकेबाजी