धक्कादायक! बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 22:39 IST2021-12-16T22:39:09+5:302021-12-16T22:39:43+5:30
Nagpur News बहिणीच्या लग्नाच्या दिवशी एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन मेश्राम (२६), रा. गोंडपुरा पारडी, असे मृत युवकाचे नाव आहे.

धक्कादायक! बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाची आत्महत्या
नागपूर : बहिणीच्या लग्नाच्या दिवशी एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन मेश्राम (२६), रा. गोंडपुरा पारडी, असे मृत युवकाचे नाव आहे.
नितीन मिस्त्रीकाम करीत होता. त्याच्या बहिणीचे लग्न बुधवारी होते. रात्रीच्या वेळी नितीनने आपल्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. पारडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. लग्नाच्या आधी ही घटना घडल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.