मुसळधार पावसाने झालेले प्रचंड नुकसान पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याने केले विषप्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 21:59 IST2022-08-02T21:59:02+5:302022-08-02T21:59:36+5:30
Nagpur News सततच्या मुसळधार पावसामुळे पिकाचे झालेले प्रचंड नुकसान पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

मुसळधार पावसाने झालेले प्रचंड नुकसान पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याने केले विषप्राशन
नागपूर : सततच्या मुसळधार पावसामुळे पिकाचे झालेले प्रचंड नुकसान पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदागाेमुख येथे मंगळवारी (दि. २) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
फनिंद्र खेमराज मिलमिले (५०, रा. नांदागाेमुख, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे शेती असून, ती शेती त्याच्या आईच्या नावे आहे. त्याचे संयुक्त कुटुंब असल्याने शेतीचे सर्व व्यवहार व शेतीची कामे फनिंद्रच करायचा. त्याने यावर्षी शेतात कपाशीची लागवड केली हाेती. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले व पीक खराब हाेण्याच्या मार्गावर हाेते.
ताे चार दिवसांपूर्वी पंचमढी (मध्य प्रदेश) येथे नागद्वार यात्रेला गेला हाेता. यात्रेवरून नुकताच परत आला आणि मंगळवारी सकाळी पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेला हाेता. पिकाची स्थिती विदारक दिसताच ताे घरी परत आला आणि कुणाचेही लक्ष नसताना विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच पत्नी संगीताने त्याला सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास ठाणेदार अमितकुमार आत्राम व रवींद्र चटप करीत आहेत.