Shivshahi buses to Pune every hour | दर तासाला पुण्यासाठी शिवशाही बसेस

दर तासाला पुण्यासाठी शिवशाही बसेस

प्रवाशांसाठी सुविधा : विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा
नागपूर : पुण्याला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे एसटीने पुण्याला गणेशपेठ आगारातून एसी शिवशाही बसेस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर तासाला पुण्यासाठी शिवशाही बसेस उपलब्ध होणार आहेत.
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. कठीण परिस्थितीत एसटीने उत्पन्न वाढविण्यासाठी माल वाहतूक सुरू केली. त्यानंतर खासगी गाड्यांचे टायर रिमोल्ड करण्याचे काम सुरू केले. महाराष्ट्र शासनाने आदेश दिल्यानंतर एसटीने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक सुरु केली. पुण्याला विदर्भातून जाणारे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे एसटीने दर तासाला पुण्यासाठी गणेशपेठ आगारातून शिवशाही बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन ऑक्टोबरपासून दुपारी तीन ते रात्री नऊ दरम्यान गणेशपेठ आगारातून दर तासाला पुण्यासाठी शिवशाही बसेस सोडण्यात येणार आहेत.

दर तासाला सोडणार शिवशाही बसेस
पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांच्या मागणीवरून एसटीने दर तासाला शिवशाही बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवशाही बसेसला उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.

Web Title: Shivshahi buses to Pune every hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.