शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्याचे पारणे फेडणारा शिवराज्याभिषेक सोहळा

By admin | Updated: June 12, 2014 01:16 IST

महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने आज नागपुरातील शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने शिवाजी चौक,

महाल परिसर दुमदुमला : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची उपस्थिती
नागपूर : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने आज नागपुरातील शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने शिवाजी चौक, गांधीगेट महाल येथे हा सोहळा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आला. शास्त्रोक्त वेदमंत्रांच्या उच्चारणात शिवाजींच्या राज्याभिषेकाचे एतिहासिक महत्त्व जपताना पार पडलेला हा सोहळा आपण थेट शिवाजी महाराजांचा खराखुराच राज्याभिषेक अनुभवीत असल्याचा भास निर्माण करणारा होता. याप्रसंगी वातावरणात कमालीचा उत्साह आणि आनंद पसरला.
या कार्यक्रमाला शहरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सद्गुरुदास महाराज, राजे मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंग भोसले, ज्ञानेश्वर पुरंदरे, सुमंत टेकाडे, नगरसेवक बंडू राऊत, नगरसेविका प्रभा जगनाडे, रश्मी फडणवीस, प्रभाकरराव भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे चरित्र सामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून या सोहळ्याचे आयोजन २४ शिवप्रेमी संघटनांनी एकत्रितपणे केले होते. शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात रायगड व नागपूर अशा दोनच जागी आयोजित करण्यात येतो. या सोहळ्याचा प्रारंभ सकाळी ७.३० वाजता करण्यात आला. शिवाजी महाराजांची पालखी टिळक पुतळा येथून काढण्यात आली. ११ ब्राह्मणांच्या वैदिक मंत्रघोषाने व पंचामृताने महाराजांना स्नान घालण्यात आले.
त्यानंतर नजराणाही दाखविण्यात आला. याप्रसंगी सर्र्वांनीच मंगलवेश धारण केला होता. शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांनी या सोहळ्याला रंगत आणली. स्व. चिमासाहेब भोसले व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनीही प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी विविध प्रकारच्या शस्त्रांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यात मोठ्या संख्येने मुलींनीही क्रीडा प्रकार सादर केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्ता शिर्के, महेश महाडिक, रणजित जोशी, दिलीप दिवटे, श्रीकांत देहाडराय, सुधीर अभ्यंकर, विवेक पोहाणे, श्याम तांबोळी, प्रवीण घरजाळे, रोहन सावंत, पंकज पराते, नीलेश पंडाग्रे, भूषण वानखेडे, सचिन वाघाडे, विशाल देवकर, जय आस्कर, आनंद कोतेवार, अभिजित डायगव्हाणे, प्रसाद काळे, आकाश ठाकरे, सुहास माहूरकर, क्षितिज नवघरे, संकेत बांगडकर, सानिध्य लटोर, शुभम पेकडे, भागवत तिवारी, अनंता नरसापूरकर, पराग सपाटे, अतुल ढाकरे, कुशांक गायकवाड, श्रद्धा पाठक, श्वेता भोसले, ऋचा शिर्के, श्वेता दहीकर यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)