शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे : माजी आ. अनिल गोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 08:40 PM2019-12-18T20:40:58+5:302019-12-18T20:43:11+5:30

मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सरकारने स्थगिती देऊ नये, भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि स्मारक उभारावे

Shivaji Maharaj memorial must be : Ex. MLA Anil Gote | शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे : माजी आ. अनिल गोटे

शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे : माजी आ. अनिल गोटे

googlenewsNext
ठळक मुद्दे भ्रष्टाचाराची चौकशी करा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सरकारने स्थगिती देऊ नये, भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि स्मारक उभारावे, अशी मागणी माजी आ. अनिल गोटे यांनी बुधवारी विधिमंडळाच्या परिसरात केली.
गोटे म्हणाले, फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही भ्रष्टाचारमुक्त ठेवले नाही. महाराजांच्या तलवारीच्या उंचीपेक्षा मॅन लहान आहे. मूळ ३८ मीटरची तलवार ४५.५० मीटर केली. पुतळ्याची उंची ८३.२ मीटरवरून ७५.७ मीटरवर आणली आहे. याचे डिझाईन इजिस इंडिया कन्सलटिंग इंजिनिअर्सने नव्हे तर एल अ‍ॅण्ड टी कंपनीने केले आहे. महाराजांच्या पुतळ्यासाठी सूचित केलेल्या जागांना एकही वरिष्ठ अधिकाऱ्याने भेट दिली नाही वा पाहणी केली नाही, हे विदारक सत्य लपवून ठेवण्याचे कारण काय, असा सवाल गोटे यांनी केला. शिवस्मारकाच्या उभारणीचा शासन निर्णय ४ जुलै २००५ रोजी झाला. याउलट गुजरात येथील सरकार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक सर्व परवानग्या घेऊन दोन वर्षांत पूर्ण करून पर्यटनाखाली खुले करण्यात आले. मग शिवाजी महाराजांचे स्मारकाचे बांधकाम लांबविण्याचे कारण काय, असा सवाल आहे. अजूनही स्मारकाचे बांधकाम सुरू होऊ नये, हे एक गूढच आहे.

Web Title: Shivaji Maharaj memorial must be : Ex. MLA Anil Gote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.