शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:13 IST2021-02-21T04:13:08+5:302021-02-21T04:13:08+5:30

पिपळा (डाकबंगला) : परिसरातील इसापूर येथील शिवमित्र परिवारातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...

Shiva Jayanti in excitement | शिवजयंती उत्साहात

शिवजयंती उत्साहात

पिपळा (डाकबंगला) : परिसरातील इसापूर येथील शिवमित्र परिवारातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला हाेता. हनुमान मंदिराजवळ आयाेजित कार्यक्रमात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावात प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमात साेनाली नक्षिणे, प्रदीप कमाले, मिलिंद केदार यांनी समाजप्रबाेधन केले. यावेळी राहुल सालोडकर, नंदकिशोर महल्ले, योगेश भोयर, मंगेश महल्ले, साहिल ढेपे, प्रशांत खोकले, राहुल महल्ले, सचिन ढेपे, अक्षय सालोडकर, विष्णु ढेपे, अतुल वटकर आदी उपस्थित होते. तसेच इसापूर येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोरे, नारायण ठाकरे, मीना मोरे, लता बावणे, किशोर ठाकरे, कल्पना तांडेकर, प्रमोद लांडगे, राहुल ठाकरे, दीपक अडबैले, गोलू ढेपे, तुषार मडामे, कुणाल भोयर, विक्की दखने, महेश भिसे, पवन ठाकरे, महेंद्र ठोंबरे उपस्थित होते.

Web Title: Shiva Jayanti in excitement