पाटण सावंगी येथे शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:13 IST2021-02-21T04:13:13+5:302021-02-21T04:13:13+5:30

पाटण सावंगी : स्थानिक शिवाजी चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. काेराेनामुळे साधेपणाने युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी ...

Shiva Jayanti celebrations at Patan Sawangi | पाटण सावंगी येथे शिवजयंती उत्साहात

पाटण सावंगी येथे शिवजयंती उत्साहात

पाटण सावंगी : स्थानिक शिवाजी चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. काेराेनामुळे साधेपणाने युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जगदंबा ढोलताशा पथकाने शिवरायांना मानवंदना दिली. त्यानंतर श्रीकांत नानोटे यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी सरपंच रोशनी ठाकरे, उपसरपंच दीपक दलाल, रवींद्र जाधव, उद्धव चाैधरी, प्रवीण बोबडे, प्रकाश ताजने, अरुण चापले, नितीन मोहगावकर, नंदकिशोर राऊत, हारून शेख उपस्थित होते. कार्यक्रमाला अक्षय चिकटे, मोंटू संभे, रोशन डुकरे, प्रकाश पडाळ, ऋषिकेश जिचकार, गणेश ताजने, राहुल देव, कुंदन गिरे, सागर तेलंग, अतुल मलवे, आनंद मामुलकर, पप्पू सातपैसे, निकू एकूनकार, सचिन कानफाडे, स्वप्निल ताजने, मिथुन चापले, सचिन संभे, सचिन गायकवाड व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Shiva Jayanti celebrations at Patan Sawangi