तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी काँग्रेससह शिवसेना सरसावली; सभास्थळी जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:53 IST2020-06-23T11:52:34+5:302020-06-23T11:53:01+5:30
युवक काँग्रेस प्रहार संघटना युवा सेना कार्यकर्त्यांनी मंगळवरी सुरेश भट सभागृहाबाहेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्नार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी काँग्रेससह शिवसेना सरसावली; सभास्थळी जोरदार घोषणाबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभास्थळी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठिंबा द्यायला काँग्रेससह शिवसेनेचे कार्यकर्ते हजर झाले आहेत.
युवक काँग्रेस प्रहार संघटना युवा सेना कार्यकर्त्यांनी मंगळवरी सुरेश भट सभागृहाबाहेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्नार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
युवा सेना जिल्हाधिकारी विक्रम राठोड, काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांचा नेत्तृत्वात सभागृहाबाहेर मुंढे यांच्या समर्थनात जोरदार नारेबाजी करण्यात आली. या सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे . परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून निदर्शकांना सभागृहाच्या परिसरातून दुसरीकडे जाण्यास सांगण्यात आले आहे.