शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिंदे कणखर नेते, त्यांच्यामुळे महायुतीला मजबुती

By योगेश पांडे | Updated: November 27, 2024 17:59 IST

चंद्रशेखर बावनकुळे : कॉंग्रेस नेत्यांची मुजोरी कायमच

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :महायुतीच्या नेत्यांची लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नव्हती. तर महाविकासआघाडीचे पक्ष केवळ मुख्यमंत्रीपद डोळ्यासमोर ठेवून लढत होते. जनतेने अखेर आमच्यावरच विश्वास टाकला. आता विरोधकांकडून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठविण्याची सुरुवात झाली. मात्र शिंदे यांनी उघडपणे आपली भूमिका मांडत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. मुळात शिंदे हे कणखर नेतेच असून त्यांच्यामुळे महायुती आणखी मजबूत झाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते बुधवारी पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. मात्र शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल हे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी मी त्यांचे आभार मनतो. शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी मौलिक कार्य केले आहे. त्यांच्या रुपाने राज्याला कणखर मुख्यमंत्री लाभला होता. त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. महायुतीचा चेहरा म्हणून त्यांनी समर्पितपणे कार्य केले. महायुतीचे नेते म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही राज्यासाठी योग्यच आहे. शिंदे हे खरोखरच कधी रडणारे नव्हे तर लढणारेच नेते आहेत. लढवय्या स्वभावातूनच त्यांनी राजकारण केले आहे. महायुती अभेद्य आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे बावनकुळे म्हणाले.

हरल्यावर मविआला ईव्हीएमच दिसतेजेव्हा जेव्हा महाविकासआघाडी हारते तेव्हा ईव्हीएम खराब असते. मात्र ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली असते. तेव्हा त्यात त्यांना कुठलीही खोट दिसत नाही. लोकसभेत आम्हाला अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने आम्ही ईव्हीएमवर खापर न फोडता आत्ममंथन केले व जनतेत जाऊन काम केले. मात्र कॉंग्रेस व मविआचे नेते मुजोरी करत आहेत. हे जनतेला आवडत नाही. नाना पटोले यांनी तर ईव्हीएमवर बोलण्याऐवजी स्वत:च्या गावात जाऊन कारणांचा शोध घ्यावा, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाMahayutiमहायुतीnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस