शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

शेरदिल खाकीने काळाशी लढून वाचविले माय-लेकाचे प्राण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:27 IST

ठाणेदार भेदोडकर यांचे रियल हिरो म्हणून सोशल मीडियात कौतुक

नरेश डोंगरेनागपूर :  रात्रीची वेळ आकाशात वीज चवताळल्यासारखी वारंवार कडाडत होती. खाली छातीएवढे पाणी वरवर चढतच होते. वरच्या रूममध्ये एक महिला व मुलगा मदतीसाठी याचना करीत होती. बचाव पथकांचे क्रमांक व्यस्त होते. परिणामी तीन तासांपासून मदतीच्या प्रतिक्षेत असलेली महिला आणि मुलगा जीवाच्या भितीने ईश्वराची करुणा भाकत होती. अशात शेरदिल खाकी अर्थात यशोधरानगरचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर तेथे पोहोचले व जीवाची बाजी लावून तीव्र प्रवाहातून जाऊन त्यांनी धंतोली परिसरात अडकलेल्या मायलेकाचे प्राण वाचविले. 

छातीएवढ्या पाण्यातून सुरक्षित स्थळी n ठाणेदार भेदोडकर यांनी वाहनातील नायलॉनचा दोर कंबरेच्या बेल्टला बांधला अन् छातीभर पाण्याच्या तीव्र प्रवाहातून पलिकडच्या इमारतीकडे पोहत निघाले. चित्रपटगृहाच्या एक्झिट गेटवरून वरच्या रुमकडे चढले. n अंधारात केवळ मदतीसाठी ओरडणाऱ्या मायलेकाचे आवाज ऐकू येत होते. भेदोडकरांनी मोबाईलचा टॉर्च सुरू करून समोर येण्याचे आवाहन केले. त्यानुसार प्रचंड घाबरलेले मायलेक समोर आले. एक - एक करून १६ वर्षीय मुलगा व महिलेला छातीएवढ्या पाण्यातून त्यांनी सुरक्षितस्थळी नेले.  

चित्रपटगृहाची मालकीणजीवदान मिळालेल्या महिलेचे नाव सुनीता तिवारी असून त्या जानकी चित्रपटगृहाच्या मालकीण आहेत. दोघेच मायलेक सध्या तेथील एका रूममध्ये राहायला होते. आपला जीव वाचला, यावर त्यांचा बराच वेळ विश्वास बसत नव्हता. भानावर आल्यानंतर त्या सारख्या पाया पडत आभार व्यक्त करीत होत्या.

घरी निघताना आला कॉलपोलिस अधिकाऱ्याने केलेल्या मदतकार्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाणेदार भेदोडकर यांच्यावर रियल हिरो म्हणून कोतुकाचा वर्षाव होत आहे. भेदोडकर नाईट राउंड संपवून घराकडे निघण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात कंट्रोलने वायरलेसवर कॉल दिला.

एका इमारतीच्या आत एक महिला आणि मुलगा अडकला आहे. त्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर अनर्थ होऊ शकतो, असा हा कॉल होता. तो ऐकताच ठाणेदार भेदोडकरांनी आपल्या सहकाऱ्यांना पोलीस वाहन धंतोलीतील जानकी चित्रपट गृहाकडे घेण्याची सूचना केली. काही वेळेतच ते तेथे पोहचले. 

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूरfloodपूरriverनदी