शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

... तिला उपरती झाली अन त्यांच्या बेड्या सुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:23 IST

बलात्कार करतानाची व्हिडीओ क्लीप तयार करून ती क्लीप व्हायरल करण्याचा धाक दाखवून वारंवार बलात्कार करवून घेणाऱ्या महिलेला उपरती झाली.

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कार करतानाची व्हिडीओ क्लीप तयार करून ती क्लीप व्हायरल करण्याचा धाक दाखवून वारंवार बलात्कार करवून घेणाऱ्या महिलेला उपरती झाली. तिची तक्रार खोटी आहे, हे चौकशीतून पोलिसांच्या आधीच लक्षात आले होते. मात्र, पुढे कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू नये म्हणून पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली अन् सामूहिक बलात्काराचा आरोप लावणाऱ्या महिलेचे कोर्टात कलम १६४ अन्वये बयान नोंदवून घेतले. यावेळी आरोप लावणाºया महिलेने बलात्कार झालाच नाही, आपण दबावात येऊन तक्रार नोंदवली होती, असे कोर्टापुढे सांगितले अन् सामूहिक बलात्काराच्या आरोपात नाहक गोवले गेलेल्या छोटे बाबा तसेच बंटी श्रीवास या युवकांची सुटका झाली.लोकमतने लावून धरल्यामुळे सर्वत्र चर्चेला आलेल्या या प्रकरणाची माहिती अशी, २४ डिसेंबर २०१८ ला गणेशपेठ पोलिसांकडे एका नवविवाहितेने छोटे बाबा आणि बंटी श्रीवासविरुद्ध तक्रार नोंदवली. कचोरीतून (नाश्त्यातून) गुंगीचे औषध खाऊ घालून या दोघांनी बलात्कार केला. त्याची मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत तयार केली, ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन हे दोघे आणि त्यांचे पाच ते सहा मित्र तीन महिन्यांपासून सामूहिक बलात्कार करीत असल्याचे या महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. महिला-मुली संरक्षण कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशपेठ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून छोटे आणि बंटीला अटक केली. त्यांचा पीसीआर मिळवला. पीसीआरदरम्यान कसून चौकशी करूनही छोटे बाबा अन् बंटीकडून गुन्ह्याची कबुली किंवा बलात्कार झाल्याचे अधोरेखित करणारा कसलाही पुरावा मिळाला नाही. त्याचदरम्यान तक्रारदार महिला, तिचा पती वारंवार विसंगत माहिती देत असल्याने पोलिसांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली. असे काही घडलेच नाही, हे तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी तक्रारदार महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तोपर्यंत ते छोटे आणि बंटी न्यायालयीन कस्टडीत पोहचले. तपास अधिकारी कुंडेकार यांनी हा प्रकार पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या लक्षात आणून दिला. दोन युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मागावर असल्याचे लक्षात आल्याने उपायुक्त माकणीकर यांनी तक्रारदार महिलेची पुन्हा विचारपूस केली.महिलेलाही उपरती झाली आपण फार मोठी चूक केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने खोटी तक्रार नोंदविल्याची कबुली दिली. उपायुक्त माकणीकर यांनी समाजसेवी महिलांच्या माध्यमातून तिचे समुपदेशन केले. त्यानंतर महिलेने कोर्टात बयान नोंदविताना ‘पतीच्या दडपणात येऊन आपण छोटे बाबा अणि बंटी श्रीवास विरुद्ध खोटी तक्रार नोंदवली. बलात्कार झालाच नाही’ असे तिने नमूद केले. त्यामुळे आरोपी म्हणून कारागृहात पोहचलेल्या छोटे आणि बंटी तसेच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणाºया पोलिसांचाही मार्ग मोकळा झाला. उपायुक्त माकणीकर यांनी लगेच विधी अधिकारी आणि तपास अधिकाºयांकडून ‘फॉल्स कम्प्लेंटचे बी फायनल’ तयार करून घेतले. ते कोर्टात सादर केल्याने हे प्रकरण निकाली निघाले. अर्थात छोटे बाबा आणि बंटी श्रीवास निर्दोष असल्याने त्यांची या केसमधून मुक्तता झाली. सध्या ते रोजंदारीवर काम करून कुटुंबीयांची उपजीविका भागविण्यास मदत करीत आहेत.सोशल मीडियावर धूमलोकमतच्या वृत्त मालिकेमुळे सर्वत्र चर्चेला आलेल्या या बोगस सामूहिक बलात्कार प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावरही चांगलीच धूम मचवली आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमाने लोकमतचे या प्रकरणाच्या वृत्याचे कात्रण अनेक समूहांमध्ये (ग्रुप) चर्चेला आले आहे. त्यावर संतापजनक आणि भावनिक प्रतिक्रियाही नोंदविल्या जात आहेत. सामूहिक बलात्कारासारख्या गुन्ह्याची केस कोर्टातून खारीज (डिसमिस) कशी झाली, या गंभीर गुन्ह्यात गोवले गेलेले तरुण बाहेर कसे आले, त्याबाबतही सोशल मीडियावर विचारणा होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी