शरद पवार १५ जुलै रोजी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 21:32 IST2022-07-09T21:32:13+5:302022-07-09T21:32:39+5:30

Nagpur News महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत.

Sharad Pawar on July 15 in Nagpur | शरद पवार १५ जुलै रोजी नागपुरात

शरद पवार १५ जुलै रोजी नागपुरात

नागपूर : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. १५ व १६ जुलै रोजी पवार हे नागपुरात मुक्कामी राहणार असून, विविध कार्यक्रम व पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

पवार यांचे १५ जुलै रोजी नागपुरात आगमन होईल. कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. सी.डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार डॉ. सुधीर भोंगळे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. यानंतर १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरेश भट सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यास ते उपस्थित राहतील. या मेळाव्याच्या तयारीसाठी शनिवारी राष्ट्रवादीच्या गणेश पेठेतील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Web Title: Sharad Pawar on July 15 in Nagpur