शांतिनगरात ६० तोळे सोने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:43 IST2017-09-11T01:43:40+5:302017-09-11T01:43:55+5:30

शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीतील महेशनगर येथील एका व्यापाºयाच्या घरातून १८ लाख रुपयाचे दागिने व दीड लाख रुपयाची रोख चोरीला गेली.

 In Shantinagar, 60 tola gold was destroyed | शांतिनगरात ६० तोळे सोने पळविले

शांतिनगरात ६० तोळे सोने पळविले

ठळक मुद्दे व्यापाºयाच्या घरी भरदिवसा चोरी : दीड लाखाची रोखही चोरली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीतील महेशनगर येथील एका व्यापाºयाच्या घरातून १८ लाख रुपयाचे दागिने व दीड लाख रुपयाची रोख चोरीला गेली. रविवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
मो. इलियास अजीज कमानी आपल्या दोन मुलांसोबत आणि नातवांसोबत राहतात. कमानी यांच्या मुलांचा सीताबर्डीत मोबाईलचा व्यवसाय आहे. कमानी हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. रविवारी दुपारी कमानी परिवार आपल्या नातेवाईकाकडे गेले होते.
नातेवाईकाचे घर थोड्या दूर अंतरावरच आहे. दुपारी सुमारे १ वाजता घरात महिला उपस्थित होत्या. त्यावेळी मोलकरीण काम करण्यासाठी आली. मोलकरीण घरातील काम करीत असताना महिला सदस्य या नातेवाईकाकडे गेल्या. २.३० वाजता त्या परत आल्या. तेव्हापर्यंत मोलकरीण घराला कुलूप लावून निघून गेली होती. जाताना तिने घराची चावी शेजाºयांकडे दिली होती.
या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात दोन आलमाºया होत्या. आलमारीची चावी आलमारीच्या वर ठेवली होती. चोरांनी दोन्ही आलमाºया सहजपणे उघडल्या. लाकडाच्या आलमारीतून दीड लाख रुपये आणि लोखंडी आलमारीतून ६० तोळे सोन्याचे दागिने होते. रोख रक्कम व दागिने घेऊन चोर फरार झाले.
सायंकाळी ४ वाजता कमानी यांचा नातू घरी आला. यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. लगेच पोलिसांना सूचना देण्यात आली. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, झोन तीनचे राहुल माकणीकर घटनास्थळी पोहोचले. शांतिनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  In Shantinagar, 60 tola gold was destroyed