संघाच्या विजयादशमी सोहळ्यात शंकर महादेवन राहणार प्रमुख अतिथी

By योगेश पांडे | Updated: October 5, 2023 13:59 IST2023-10-05T13:59:16+5:302023-10-05T13:59:35+5:30

२४ ऑक्टोबर रोजी आयोजन

Shankar Mahadevan will be the chief guest at the Sangh's Vijayadashami celebrations, organized on October 24 | संघाच्या विजयादशमी सोहळ्यात शंकर महादेवन राहणार प्रमुख अतिथी

संघाच्या विजयादशमी सोहळ्यात शंकर महादेवन राहणार प्रमुख अतिथी

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे आयोजन २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

संघाच्या प्रक्रियेत विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे मोठे महत्व आहे. दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्यात सरसंघचालक डॉ.भागवत यांचे भाषण होते व त्यातुन संघाच्या भविष्यातील योजनांचे संकेत मिळतात. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूका व संघाच्या स्थापनेला होत असलेले शंभर वर्षे या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी उत्सवाला विशेष महत्व आहे आहे. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४० वाजता रेशीमबाग मैदानावर कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाअगोदर संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन होईल. या सोहळ्याला अनेक व्हीव्हीआयपी अतिथीदेखील उपस्थित राहतील.

Web Title: Shankar Mahadevan will be the chief guest at the Sangh's Vijayadashami celebrations, organized on October 24