शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शालीमार एक्सप्रेस रुळावरून घसरली; नागपुरात मोठा अपघात टळला

By नरेश डोंगरे | Updated: October 22, 2024 19:01 IST

कळमना यार्डातील घटना : प्रवासी गोंधळले; मात्र कुणालाही दुखापत नाही

नरेश डोंगरे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्थानकावरून गोंदियाकडे निघालेल्या शालीमार एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. कळमना यार्डाजवळ मंगळवारी दुपारी ही घटना घडली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला आणि कोणत्याही प्रकारची जिवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. 

ट्रेन नंबर १८०२९ शालीमार एक्सप्रेस नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी मुंबईहून नागपूरला पोहचली. थांब्यानंतर ती नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकावरून गोंदियाकडे जायला निघाली. कळमना यार्डाकडे जात असताना दुपारी २.५ च्या सुमारास अचानक ट्रेनच्या इंजिनपासूनचा तिसरा कोच (पार्सल कोच) तसेच स्लिपर कोच नंबर एस-२ रुळावरून खाली घसरले. त्यामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला. काही तरी वेगळे घडल्याचे लक्षात आल्याने प्रवासी गोंधळले आणि आरडाओरड करू लागले. दरम्यान, ट्रेन मॅनेजरकडून रेल्वे कंट्रोलला शालीमार रुळावरून खाली घसरल्याची माहिती मिळाल्याने  दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनात खळबळ निर्माण झाली. विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी, अप्पर व्यवस्थापक एस.पी. चंद्रीकापूरे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीपसिंग यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वीच मदत कार्य करणारे रेल्वे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत घटनास्थळी पोहचले होते.  

दरम्यान, अपघातग्रस्त कोच बाजुला करून रुळ दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. सायंकाळी ६.३५ पर्यंत मदतकार्य सुरूच होते. गाडीला दुसरे कोच जोडल्यानंतर रात्री ७.३० नंतरच शालीमार एक्सप्रेस पुढच्या प्रवासाला निघणार असल्याचे अधिकारी सांगत होते. 

कुणालाही दुखापत नाहीसुदैवाने गाडीचा वेग फारच कमी होता. त्यामुळे एक मोठा अपघात टळला. गाडीचा अपघात झाला असला तरी कुणालाही फारशी दुखापत झाले नसल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी दपूम रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानक, गोंदया, डोंगरगड तसेच राजनांदगाव स्थानकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे अधिकारी सांगत होते.

अनेक गाड्यांचे सुरक्षित अंतरावरअपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेन नंबर १२९९४ पुरी गांधीधाम एक्सप्रेस, ट्रेन नंबर १२१०६ विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन नंबर २०८२३ पुरी अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन नंबर ११७५३ ईतवारी रिवा स्पेशल, ट्रेन नंबर ०८७४४ ईतवारी गोंदिया मेमू स्पेशल नागपूरपासून सुरक्षित अंतरावर थांबविण्यात आल्या. या सर्व गाड्यांचे वेळापत्रक त्यामुळे बिघडले. तर, ट्रेन नंबर ११०३९ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ईतवारी ऐवजी कळमना मार्गे चालविण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे