शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी : संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:02 IST

Nagpur : राज्य शिक्षण आयुक्तांसह सचिवांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या कारवाईदरम्यान घडणाऱ्या घडामोडीत बुधवारी राज्याचे शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह आणि प्राथमिक विभागाचे संचालक गोसावी यांनी नागपुरात पोहोचून शहराचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेतली घोटाळ्यात सहभागी संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका, असे निर्देश शैक्षणिक अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती आहे.

शालार्थ आयडी प्रकरणाची सायबर, सदर पोलिस आणि एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे मात्र, संशयाच्या आधारावर उच्च अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे चौकशीत पोलिसांनी बऱ्याच अधिकाऱ्यांना अटक केली आहे अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी भीतीपोटी पसार झाले आहेत. यामुळे प्रशासकीयस्तरावरील चौकशीला विलंब व मूळ दोषींपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याचे बोलले जात आहे. शिक्षण विभागाअंतर्गत चौकशीवर परिणाम होत असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे नागपुरात कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी काम करण्यास तयार नाहीत, अशी गंभीर बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

या बैठकीत पोलिस आयुक्तांनी एसआयटीमार्फत सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली शिक्षण विभागानेही त्यांच्या चौकशीचा आढावा सादर केला. शिक्षण विभागाला पोलिसांकडील काही कागदपत्रांची गरज भासणार आहे. ती कागदपत्रे देण्यावरही दोन्ही विभागांचे एकमत झाल्याचे समजते.

मेंढे, वाघमारेवर कुणाचा वरदहस्त ?माजी उपसंचालक सतीश मेंढे आणि निलंबित वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे हे मात्र फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र हे अधिकारी पोलिसांच्या तावडीत का येत नाही, यांच्यावर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

दोन बडे अधिकारी पोलिस कोठडीतचउपसंचालक उल्हास नरड यांच्यासह कार्यालयातील लिपिक, इतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती सायबर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात पुन्हा नरड यांना अटक झाली होती माजी उपसंचालक अनिल पारधी, वैशाली जामदार आणि प्रभारी उपसंचालक चिंतामण वंजारी यांनाही अटक झाली आहे. जामदार, वंजारी पोलिस कोठडीत आहे.

अधिवेशनापूर्वी अहवालबोगस शिक्षक आणि शालार्थ आयडीबाबतचा अहवाल पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शासनाला सादर करायचा असल्याने शिक्षण विभागावर लवकर अहवाल देण्याचा दबाव आहे. त्यामुळे चौकशी केल्यावरच अधिकाऱ्यांना अटकेची कारवाई करावी आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, याबाबतचे अधिकृतपत्र प्रधान सचिवांकडून पोलिसांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षण