चाकु बाळगणारा शाहरुख काल्या गजाआड
By दयानंद पाईकराव | Updated: April 27, 2024 17:07 IST2024-04-27T17:06:24+5:302024-04-27T17:07:12+5:30
Nagpur : अमरावतीतील कुख्यात गुन्हेगाराला शस्त्र बाळगण्या प्रकरणी अटक

Shahrukh Kalya arrested for keeping weapon
नागपूर : चाकु घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक करून गजाआड केले आहे. फारुख खान समशेर खान उर्फ शाहरुख काल्या (३०, रा. अकबरनगर पोलिस ठाणे कोतवाली जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शुक्रवारी २६ एप्रिलला गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. त्यांना गंगा जमुना भांगडा गल्ली साईबाबा पान पॅलेसजवळ एक संशयीत आरोपी दिसला. त्याला हटकले असता तो पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेत ३०० रुपये किमतीचा मोठा लोखंडी चाकु व रोख ४४० असा एकुण ७४० रुपयांचा मुद्देमाल आढळला. आरोपी शाहरुख काल्या हा अमरावतीतील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपीविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे निरीक्षक मुकुंद ठाकरे, उपनिरीक्षक मधुकर काठोके, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, विशाल रोकडे, जितेश रेड्डी, दिपक लाकडे यांनी केली.