नागपुरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:02 IST2019-07-11T00:01:21+5:302019-07-11T00:02:11+5:30
एका सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवर पॉर्न फिल्म दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार यशोधरानगर परिसरात उघडकीस आला. यशोधरानगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

नागपुरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवर पॉर्न फिल्म दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार यशोधरानगर परिसरात उघडकीस आला. यशोधरानगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची आई आरोपीसोबत पत्नीच्या नात्याने राहते. तिला अल्पवयीन मुलीसह आणखी दोन मुलं आहेत. एक मुलगा पहिल्या पतीचा आहे. ती सदर येथील एका हॉटेलमध्ये काम करते. आरोपी वडील मेकॅनिकचे काम करीत होता. आतातो बेरोजगार आहे. त्याच्या पत्नीने पीडित अल्पवयीन मुलीला पहिल्या पतीची मुलगी असल्याने आपल्या आईवडिलाकडे पाठवले होते. काही दिवसांपूर्वी सावत्र वडिलानेच तिला आपल्यासाबेत ठेवून शिकवण्याचे आमिष दाखवून घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी तिच्या आईला आरोपीच्या मनात काय आहे, याची कल्पना नव्हती.
२२ मे रोजी पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीशी बळजबरीने शारीरिक संबंध निर्माण केले. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे मुलीने घाबरून कुणाला काही सांगितले नाही. यानंतर आरोपी तिला मोबाईलवर पॉर्न फिल्म दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. सातत्याने हाते असलेल्या कृत्यामुळे मुलगी घाबरली होती. तिने आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला आणि आईला सर्व प्रकार सांगितला. सोमवारी पीडित मुलगी आईसोबत पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेली. याची माहिती होताच आरोपी वडिलाचे समर्थकही ठाण्यात पोहोचले. त्यांनी आई व मुलीवर तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकला. पोलिसांनीही सक्रियता न दाखवल्याने प्रकरण तिथे शांत झाले. या घटनेची माहिती होताच लोकांमध्ये असंतोष पसरला. आरोपीला मोकळे सोडणे योग्य होणार नाही म्हणून त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. पीडित मुलीची आई सुद्धा तक्रार करण्यास तयार झाली. अखेर त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार व अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषणापासून संरक्षणाच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.