शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

हायप्रोफाईल, तुमच्या नावाने सेक्स रॅकेट तर चालत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 07:55 IST

फेसबुकवर नाव तुमचे, फोटो हायप्रोफाइल सेक्स वर्कर्सचे

नरेश डोंगरे

नागपूर : तपास यंत्रणांसाठी डोकेदुखी अन् सर्वसामान्यांसाठी प्रचंड मन:स्तापाचा विषय ठरलेल्या सायबर गुन्हेगारांनी आता एक नवीच शक्कल शोधली आहे. ‘एस्कॉर्ट सर्व्हीस’च्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या या गुन्हेगारांनी विविध शहरातील प्रतिष्ठितांची फेसबूक आयडी हॅक करणे सुरू केले आहे. कुणाच्याही नावाची डमी फेसबूक आयडी तयार करून त्यावर ते देखण्या तरुणींचे फोटो अपलोड करतात.अवघ्या महिनाभरात नागपुरात अशी तीन उदाहरणे उघड झाली आहे. त्याची माहिती कर्णोपकर्णी सर्वत्र पसरल्याने अनेकांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे. 

यापूर्वी सायबर गुन्हेगारांनी लॉटरी लागल्याची, डेबिट-क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याची, केवायसी अपडेट करण्याची, कर्ज, नोकरी देण्याची थाप मारून अनेकांना गंडा घातला आहे. काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी ‘सेक्सटॉर्शन’ हा प्रकार सुरू करून व्हिडीओ कॉल करत ऑनलाईन सेक्सची ऑफर देत अनेकांचे कपडे उतरवले. तो व्हिडीओ नंतर संबंधित व्यक्तीला पाठवून त्याच्याकडून बदनामीचा धाक दाखवत लाखोंची रक्कम उकळली. आता ‘सोशल मीडिया हॅकिंग आणि सेक्सटॉर्शन’च्या साखळीतील नवीन प्रकार उजेडात आला आहे. तुम्ही कोणत्याही गावात, शहरातील असा. त्याच्याशी सायबर गुन्हेगारांना देणे-घेणे नाही. ते तुमचा वापर करून तुम्हाला म:नस्ताप देतात.

हीच ‘ती’ प्रकरणेडमी फेसबूक आयडीचा गैरवापर करून सेक्स रॅकेटच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकाराची उपराजधानीत महिनाभरात तीन प्रकरण पुढे आलेली आहे. त्यातील एक मिहानमधील अधिकारी आहे. दुसरी व्यक्ती सामाजिक क्षेत्रात वावरणारी आहे. तर तिसरा उपराजधानीतील सांस्कृतिक क्षेत्राशी जुळलेला आहे.

बदनामीचा धाक, तक्रारीस नकारnअसे अनेक गुन्हे घडत असले तरी बदनामीच्या धाकाने त्याची तक्रार करणारांची संख्या नगण्य आहे. nसायबर पोलिसांकडेही अशी ओरड करत अनेक जण येत असले तरी बदनामीच्या धाकाने तक्रार मात्र नोंदवत नाहीत. nसंबंधित पोलीस अधिकारी पीडिताची डमी फेसबूक आयडी डिलीट करून त्याचा मानसिक त्रास संपवतात अन् प्रकरण उघडही होत नाही.

सेक्स जॉब के लिये संपर्क करेतुम्ही एखाद्या मोठ्या पदावर असाल, तुमची फेसबूक फॅन फॉलोईंग ठीकठाक असेल तर तुमची डमी फेसबूक आयडी हे गुन्हेगार तयार करतात. त्यावर तरुणींचे हॉट फोटो तसेच संपर्क क्रमांक दिला जातो. त्यावर संपर्क केल्यास मधूर आवाजातील ललना तुम्हाला जाळ्यात ओढते आणि नंतर तुम्हाला बदनामीचा धाक दाखवून तुमची आर्थिक पिळवणूक करते.

टॅग्स :onlineऑनलाइनsex crimeसेक्स गुन्हा