शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
2
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
3
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
4
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
5
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
6
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
7
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
8
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
9
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
10
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
11
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
12
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
13
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
14
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
15
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
16
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
17
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
18
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
19
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
20
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरच्या “हॉटेल यशराज इन”मध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड ! गरजू मुलींना पटकन श्रीमंत होण्याची दाखवली स्वप्ने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:36 IST

Nagpur : पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. कस्टमर बनलेला पोलिस-सहाय्यक हॉटेलमध्ये पाठवण्यात आला आणि त्याने वेळ साधून  इशारा दिल्यावर बाहेरून पोलिसांनी छापा टाकला.

नागपुर : नागपुरमधील उमरेड रोडजवळील हॉटेल यशराज इनमध्ये सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढे तपासासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यामध्ये सापडलेल्या आरोपी महिलेच्या विरोधात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. या कारवाईत एक आरोपी महिला अटक केली गेली आहे तर एक पीडित मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले. 

पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. कस्टमर बनलेला पोलिस-सहाय्यक हॉटेलमध्ये पाठवण्यात आला आणि त्याने वेळ साधून  इशारा दिल्यावर बाहेरून पोलिसांनी छापा टाकला.छाप्यात विद्या धनराज फुल्केले (४५, शारदा ले-आऊट खरबी येथून) या महिलेला ताब्यात घेतले आहे. 

त्यांच्याकडून २,५०० रुपये रोख, एक मोबाइल फोन, CCTV DVR, आणि अश्लील सामग्री अशा प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण सुमारे २१ हजार रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. आरोपी व पीडित दोघेही गुन्हे शाखेच्या हुड़केश्वर ठाण्यात सुपुर्द करण्यात आले. त्यांना न्यायालयात सादर केल्यानंतर पीडित मुलगी सुधारगृहमध्ये पाठवण्यात आली आहे, तर आरोपी महिलेला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. 

पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, सहाय्यक उपायुक्त अभिजित पाटील, क्राईम ब्रांचचे प्रमुख राहुल माकनिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिस्थितीत असलेल्या काही महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमावायचे आणि जलद कमाई म्हणून यशराज इनमध्ये फसवले जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिस आता आरोपी महिलेशी संबंधित मोबाईल डेटा, संपर्क नेटवर्क इत्यादींची सखोल छाननी करत आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Hotel Sex Racket Busted; Dreams of Quick Riches Lured Victims

Web Summary : Nagpur police busted a sex racket at Hotel Yashraj Inn, arresting a woman and rescuing a victim. The accused lured vulnerable women with promises of quick money. Police seized cash, phones, and other materials. Investigation is ongoing.
टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी