सात टन मांस जप्त

By Admin | Updated: May 5, 2016 03:08 IST2016-05-05T03:08:29+5:302016-05-05T03:08:29+5:30

विना परवाना व अवैधरीत्या जनावरांच्या मांसाची वाहतूक करणारा ट्रक कोंढाळी पोलिसांनी पकडला. यात सात टन मांस व ट्रक असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रकचालकास अटक केली आहे.

Seven tons of meat seized | सात टन मांस जप्त

सात टन मांस जप्त

ट्रकचालकास अटक : अवैधरीत्या जनावरांच्या मांसाची वाहतूक
कोंढाळी : विना परवाना व अवैधरीत्या जनावरांच्या मांसाची वाहतूक करणारा ट्रक कोंढाळी पोलिसांनी पकडला. यात सात टन मांस व ट्रक असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रकचालकास अटक केली आहे. ही कारवाई कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकडोह शिवारात मंगळवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रवी शंकरराव फुले (३२, रा. अमरावती) असे अटकेतील आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. ट्रकमधून विनापरवाना व अवैधरीत्या गुरांच्या मांसाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना कोंढाळी पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चाकडोह शिवारात मध्यरात्री सापळा रचला.
दरम्यान, नागपूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या एमपी-२०/एचबी-३५१८ क्रमांकाच्या ट्रकला थांबवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये अवैध कत्तल केलेल्या जनावरांचे सात टन मांस आढळून आले. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे सदर मांस सहा लाख रुपये किमतीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ट्रकमधील मांस व ट्रक असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १०९, २७९, ४२९, सहकलम ९ महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात कोंढाळीचे ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक बांबुलकर यांनी बजावली. तपास उपनिरीक्षक बांबुलकर करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Seven tons of meat seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.