शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

सात लाखांची रोकड लंपास; गणेशपेठमध्ये संशयास्पद चोरीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 21:41 IST

अ‍ॅक्टीव्हाच्या हुकला अडकवून हॉटेलमध्ये नाश्ता करणाऱ्यांची सात लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली.

ठळक मुद्दे अ‍ॅक्टीव्हाच्या हुकला अडकवून हॉटेलमध्ये नाश्ता करणाऱ्यांची सात लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली.गणेशपेठमध्ये शुक्रवारी दुपारी ही संशयास्पद बॅग चोरीची घटना घडली.

नागपूर - अ‍ॅक्टीव्हाच्या हुकला अडकवून हॉटेलमध्ये नाश्ता करणाऱ्यांची सात लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौ-याच्या निमित्ताने शहरात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असताना गणेशपेठमध्ये शुक्रवारी दुपारी ही संशयास्पद बॅग चोरीची घटना घडली. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.  

लक्ष्मीकांत सिताराम जांगीर (वय ३७) हे वर्धा मार्गावरील मेहाडीया भवनात राहतात. त्यांनी गणेशपेठ पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, जांगिर यांच्या पत्नीने त्यांना एका बॅगमध्ये ७ लाखांची रोकड भरून दिली. ही रोकड त्यांना महालमधील एका व्यक्तीला द्यायची होती. जांगिर यांच्यासोबत रवी अशोक कल्लमवार (वय ३४, रा. निर्मल कॉलनी, जरीपटका) आणि शेख सरफराज उर्फ राजा गुलामनबी खान (वय २५, रा. महेंद्रनगर, रहेमान मस्जिदजवळ) हे दोघे होते. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिटणीस पार्कजवळ एक नमकीन सेंटर आहे. दुपारी ३.१५ वाजता त्या नमकीन सेंटर समोर या तिघांनी आपली अ‍ॅक्टीव्हा लावली आणि नाश्ता करायला गेले. नाश्ता करून परतल्यानंतर त्यांना अ‍ॅक्टीव्हाला अडकवून असलेली सात लाखांची रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. जांगिर यांनी आरडाओरड करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.असा कसा सहजपणा ?या धाडसी चोरीने अनेक शंका निर्माण केल्या आहेत. जांगिर यांच्या घरून घटनास्थळाचे अंतर दुचाकीने जास्तीत जास्त १५ मिनिटांचे आहे. तर, तेथून महाल हे अंतर पाच मिनिटांचे आहे. घरून निघाल्यानंतर एवढ्या वेळेत त्यांना नाश्ता करण्याची गरज भासली. दुसरे म्हणजे, तिघे जण ही रक्कम घेऊन जात असताना त्यांनी एवढी मोठी रोकड असलेली बॅग दुचाकीला बाहेर लटकवून कशी ठेवली, त्यांनी ती सोबत का नेली नाही, असाही प्रश्न संशय वाढवत आहे. लवकर नाश्ता करून येऊ, असे सहजपणे वाटल्याने त्यांनी ती रोकड दुचाकीला अडकवून ठेवल्याचे सांगितले आहे. मात्र, हा सहजपणा खटकणारा आहे, असे पोलीस म्हणतात.

टॅग्स :theftचोरी