तेलंगणा एक्स्प्रेसमधून सात लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:31 IST2018-02-14T23:29:51+5:302018-02-14T23:31:41+5:30
प्रवासादरम्यान अज्ञात आरोपीने ट्रॉली बॅग कापून सात लाखांचे दागिने पळविल्याची घटना तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये ग्वाल्हेर ते भोपाळ दरम्यान घडली.

तेलंगणा एक्स्प्रेसमधून सात लाखांचे दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासादरम्यान अज्ञात आरोपीने ट्रॉली बॅग कापून सात लाखांचे दागिने पळविल्याची घटना तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये ग्वाल्हेर ते भोपाळ दरम्यान घडली.
रेखा राजेंद्र पालीवाल (६५) रा. खामला या आपल्या पतीसह जयपूरला लग्नासाठी गेल्या होत्या. त्या रेल्वेगाडी क्रमांक १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेसने दिल्ली ते नागपूर (कोच ए-२ , बर्थ ३७) असा प्रवास करीत होत्या. त्यांच्याकडे एक ट्राली बॅग होती. ग्वाल्हेर ते भोपाळ दरम्यान त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांची ट्राली बॅग कापून त्यामधील दागिन्यांचा बॉक्स पळविला. बॉक्समध्ये २ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या डायमंडच्या २ बांगड्या, २ कानातले किंमत १ लाख ७५ हजार रुपये, कुंदन सेट किंमत १ लाख ४० हजार, ८० हजार रुपये किंमतीचा पेंडाल सेट, २५ हजार रुपये किमतीचे कानातले आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल होता. झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना दागिन्यांचा बॉक्स चोरीला गेल्याचे समजले. नागपुरात आल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून त्यांनी या बाबत तक्रार नोंदविली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.