शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नागपुरात  सात लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:28 IST

अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत सात लाख नऊ हजार रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला.

ठळक मुद्देएफडीएची कारवाई : धडक कारवाई होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यतेल विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत सात लाख नऊ हजार रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला.प्राप्त माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेंतर्गत मस्कासाथ, इतवारी, चिखली ले-आऊट येथील येनूरकर ट्रेडिंग कंपनी, दिनेश ट्रेडिंग कंपनी, जय गणेश ट्रेडर्स, मोतीयानी ब्रदर्स, उदय ट्रेडिंग कंपनी, महालक्ष्मी ट्रेडर्स, शक्ती ऑईल ट्रेडर्स, शंकर ऑईल स्टोअर्स, किशनानी ट्रेडिंग कंपनी या विक्रेत्यांची तपासणी केली. या विक्रेत्यांकडे टिनाच्या डब्यांचा पुनर्वापर व भेसळीच्या संशयावरून रिफाईन्ड सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, ब्लेंडेड एडिबल व्हेजिटेबल तेल, रिफाईन्ड पामोलिन तेल, मोहरी तेल कच्ची घाणी, बेसन व मैदा या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. या विक्रेत्यांकडून २.६५ लाखांचे ३१४५ किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल (खुले), २.२५ लाख किमतीचे २६३३ किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल, ४२ हजारांचे ३७३ किलो शेंगदाणा तेल, १.७७ लाखांचे १७६८ किलो कच्ची घाणी मोहरी तेल (शक्ती), असा एकूण सात लाख नऊ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. या साठ्यातून एक-एक नमुना घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. नमुन्याच्या विश्लेषणानंतर अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ( दक्षता) अभय देशपांडे आणि नागपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, आनंद महाजन, विनोद धवड, प्रफुल्ल टोपले, अनंत चौधरी, अमितकुमार उपलप, स्मिता बाभरे, पीयूष मानवटकर, किरण गेडाम यांनी केली. सणासुदीच्या काळात धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाडnagpurनागपूर