मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडावी
By Admin | Updated: December 9, 2014 00:55 IST2014-12-09T00:55:36+5:302014-12-09T00:55:36+5:30
उच्च न्यायालयाने आरक्षणास दिलेली स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने उठवावी, याकरिता राज्य शासनाने मराठा समाजाची सत्य बाजू सर्वाेच्च न्यायालयात मांडून मराठा समाजाचे आरक्षण टिकवावे,

मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडावी
मराठा विद्या प्रसारक समाज : शेतकऱ्यांच्या सन्मानात रुमणे मोर्चा
नागपूर : उच्च न्यायालयाने आरक्षणास दिलेली स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने उठवावी, याकरिता राज्य शासनाने मराठा समाजाची सत्य बाजू सर्वाेच्च न्यायालयात मांडून मराठा समाजाचे आरक्षण टिकवावे, या मुख्य मागणीला घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज, मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोमवारी विधानभवनावर मोर्चा काढला.
या मोर्चाला उच्च व तंत्रशिक्षण आणि शालेय मंत्री विनोद तावडे हे सामोरा गेले. ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही निश्चिंत राहा, जे तुमच्या मनात आहे ते आमच्या हृदयात आहे. मराठा समाज हा आर्थिक, शैक्षणिक मागासलेला आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी राणे समितीची शिफारस आम्ही लावून धरू, असेही ते म्हणाले. परंतु शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार रुपये तर कापासाला सात हजार रुपये भाव देण्याच्या मागणीवर तावडे काहीच बोलले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या मोर्चात अनेक जण रुमणे घेऊन आल्याने हा मोर्चा ‘रुमणे मोर्चा’ ठरला.
नेतृत्व : मनोज आखरे, सौरभ खेडेकर, शांताराम कुंजीर, सुधीर देशमुख, डॉ. गजानन पारधी, सुधांशु मोहोड